NMJOKE

वयाच्या ३० वर्ष्यानंतर स्त्रियांमध्ये होतात हे बदल

मित्रानो स्त्री ला पूर्वी दुय्यम दर्जा दिला जात होता. घरातील कामेच करायची, घराबाहेर निघायचे नाही, पुरुषांची कामे स्त्री ने करू नये, चूल आणि मुल इथवरच स्त्री होती. मात्र आज काळ बदलला आहे स्त्री देखील पुरुष्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहे. स्त्रीने तीच अस्तित्व सिद्ध करून प्रत्येक ठिकाणी आपली ओळख निर्माण केली आहे. सगळी काम एकरून देखील स्त्री हि खम्बिरपणे घरची देखील कामे करते. अश्यात स्त्री जेव्हा तारुण्यात येते तिचे वय ३० च्या वर जाते तेव्हा तिच्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसीक बदल होतात त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

१) समजूतदारपणा : एखाद्या परिस्तिथीतुन आपण कसा मार्ग काढू शकतो ह्याची बरीच समज त्यांना वयानुसार येत जाते. यामुळे महिलांना समाजात उच्च स्थान दिले जाते. मुलांची काळजी घेणे त्यांना योग्य वळण लावणे त्याबरोबरच स्वतःच्या चुका सुधारणे अशा अनेक बाबींचा समावेश यात होतो. २) जीवन शैली/ लाईफ स्टाईल : वाढत्या वयामुळे आरोग्याचे पण काळजी घ्यायला पाहिजे. आपण कस निरोगी आयुष्य जगू शकतो याकडे त्यांचा अधिक कल असतो. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती निरोगी राहाव्यात यासाठी ती प्रयत्न करत राहते.३) उणिवांची जाणीव : वयाच्या ३० वर्षानंतर स्त्री ला समजून येते कि तिच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी/उणीव पडते आणि ती उणीव कशी आपण भरून काढू शकतो. तिला कळायला लागते कि आपण आता कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत, त्यावर साजेसा असा कोणता मेकअप करावा, समाजामध्ये आपण कसे वागायला पाहिजे. ४) आकर्षक बांधा : स्त्री पूर्वीपेक्षा सुंदर दिसू लागते त्यामुळे शारीरिक बांधा देखील सुधारतो. लोकांच्या नजर स्त्रीकडे वळतात कारण ३० वर्षयान्तर समजूतदारपणा आल्याने चुकांची दुरुस्ती त्या करतात. ५) सहनशीलता : वयाच्या मानाने तिला अनुभव पण बरेच येतात, त्या अनुभवातून जे शिकायला मिळत त्यामुळे तिची एखाद्या गोष्टीला कसे सामोरे जायचे, एखादी वाईट गोष्ट आपण कसा मार्ग काढू शकतो हे पण ती सहजपणे करू शकते.
Exit mobile version