या कारणामुळे बंद करावा लागला होता “शक्तिमान” हा कार्यक्रम

मित्रानो शक्तिमान हे नाव तुम्हा सर्वाना माहित असेलच जर तुमचा जन्म ९० च्या दशकात झाला असेल तर. ९० च्या दशकातील टीव्हीवरील लहान मुलांचा आवडता कार्यक्रम असेल तर तो शक्तिमान होता. सर्वच लहान मुले हा कार्यक्रम आवडीने पाहायचे आणि तितकीच उत्सुकताही असायची. हा कार्यक्रम इतका प्रसिद्ध होता कि अनेक वर्ष शक्तिमान च्या नावाने येणाऱ्या वस्तू विकत घ्यायचे. स्टिकर्स, कपडे, कॉमिक्स अश्या अनेक वस्तू शक्तिमान च्या नावे विकल्या जात होत्या. तुमच्यापैकी देखील अनेकांनी शक्तिमान चे कपडे घेतले असतील, मात्र हा कार्यक्रम इतका प्रसिद्ध असून का बंद झाला याविषयायी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

शक्तिमान हि मालिका पूर्वी दूरदर्शन या वाहिनीवर दाखवली जात होती. त्यावेळी खूप कमी लोकांकडे रंगीत टीव्ही असायचा आणि केबल देखील खूप कमी लोकांकडे असायची. अनेकजण तर घरी टीव्ही नसल्यामुळे मालिका बघण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी देखील जायचे. शक्तिमान मालिका दूरदर्शन चॅनेलवर दाखवली जात होती. त्यावेळी अनेक मुलं शक्तिमान मालिका पाहून गोल गोल फिरायची आणि त्यांना दुखापत व्हायची हे देखील शक्तिमान मालिका बंद होण्याचं पाहिलं कारण आहे.मुकेश खन्ना शक्तिमान हा कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवायचे. त्यावेळी मुकेश खन्ना याना शक्तिमान कार्यक्रम दाखवण्यासाठी दूरदर्शन वाहिनीला १० लाख रुपये द्यावे लागत होते. अचानक दूरदर्शन वाहिनीने मुकेश खन्ना यांच्याकडून १० लाख रुपयांऐवजी ४० लाख रुपयांची मागणी केली. त्या काळात जाहिराती इतक्या मोठ्या देखील नव्हत्या जितक्या आज आहेत. त्यामुळे ४० लाख रुपये दूरदर्शन वाहिनीला देणं मुकेश खन्ना याना परवडणार नव्हतं म्हणून त्यांनी हि मालिका बंद केली. मालिका बंद झाल्याने अनेक मुलांना वाईट वाटत होते तुम्हाला देखील त्यावेळी वाईट वाटलं असेल. स्टार उत्सव वर नंतर हा कार्यक्रम दाखवला गेला मात्र तेव्हा तो कार्यक्रम चालत नसल्याने पुन्हा बंद झाला आणि आजच्या पिढीला शक्तिमान माहित देखील नसेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *