हेमा मालिनी ला पटवण्यासाठी शोलेच्या सेट वर असे चाळे करायचे धर्मेंद्र

बॉलीवूड मधे हिरो हिरोईन चे लग्न तर खूप होतात पण सगळेच शेवट पर्यंत सोबत रहात नाहीत. असे खूप कमी लोक आहेत जे शेवट पर्यंत सोबत असतात. आपल्याला वाटत कि जस चित्रपटात दाखवतात तस वास्तविक जीवनात हिरो ला हिरोईन ला मानवायला काही कष्ट नसतील लागत पण अस काहीच नसत. चित्रपटात बघून आपल्याला देखील असच वाटत कि आपल्या जीवनात पण कधी ना कधी तर अस व्हायला पाहिजे. तस तर बॉलीवूड मधे किती तरी प्रेम कथा आहेत पण आज आपण बघणार आहोत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ची प्रेम कथा. चला मग पाहू काय केल होत धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी ला पटवायला.

बॉलीवूड ची ड्रिमगर्ल हेमा मालिनी जिच्या सुंदरतेचे लाखो फॅन्स होते आणि आज हि आहेत. अश्यात धर्मेंद्र पण तिच्या प्रेमात वेडे झाले होते आणि त्यांनी तीच मन जिंकण्या साठी एका चित्रपटाच समर्थन घेतल होत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ची प्रेम कथा बॉलीवूड च्या सर्व प्रसिद्ध आणि गोंडस प्रेमकथांमधून मधून एक आहे. आज हि बॉलीवूड मध्ये त्यांच्या जोडीला प्राधान्य दिली जाते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ची प्रेम कथा हि चित्रपटा पेक्षा कमी नाही. धर्मेंद्र ने हेमा मालिनी ला इंप्रेस करायला शोले या चित्रपटाच समर्थन घेतल, त्यांनी हेमा ला पटवायची एक हि संधी न्हवती सोडली आणि दर वेळीस अशे काही काम देखील करायचे ज्याच्यानी तिला इंप्रेस करू शकतील.धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ने शोले चित्रपटात एकत्र काम केले होते. जिथे धर्मेंद्र ने हेमा ला इंप्रेस करण्याची सुरवात केली. चित्रपटाच्या शूटिंग च्या टायमाला हेमा सोबत असलेला एक रोमँटिक सीन धर्मेंद्र नि खूप वेळा शूट करवलेला, ज्याच्या मुळे हेमा मालिनी वर त्यांची छाप पडली. आस म्हंटल जात कि धर्मेंद्र नि लाइट्सबॉय सोबत एक डील केली होती ज्याच्यात जर धर्मेंद्र नि त्यांच कान ओढल तर लाइट्सबॉय ला काही चुकी करायची आहे आणि तो शॉट री-टेक करवल्या जाईल आणि जर धर्मेंद्र नि नाकाला हात लावला तर तो शॉट ओके केला जाईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *