मुलींच्या शर्टाची बटणे उलटी का असतात पहा

आपली दुनिया अजब-गजब कारनाम्यांनी आणि विविध प्रकारच्या घटनांनी भरलेली आहे. पण काही गोष्टी अश्या आहेत, ज्या विषयी खूप कमी लोकांना माहित आहे. नाही तर असं समजा कि लोकं अश्या गोष्टी रोज पाहत असतात पण ते लक्ष नाही देत कि नेमकं हे काय आहे. अशीच एक मनोरंजक गोष्ट आहे महिलांच्या शर्ट चे बटन, जे नेहमी डाव्या बाजूला असते. कदाचित तुम्हाला माहित नसेल कि पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शर्ट चे बटन हे डाव्या बाजूला असते. ह्या मागे भरपूर कारणे आहेत. तर चला जाणून घेऊयात कि, महिलांच्या शर्टचे बटन हे पुरुषांच्या शर्टच्या विरुद्ध बाजूस का असते?

पहिले कारण : ह्या मागील पहिले कारण आहे कि, पुरुषांना शर्टचे बटन बंद करण्यासाठी किव्हा खोलण्यासाठी नेहमी डाव्या हाताचा वापर होतो, म्हणून पुरुषांच्या शर्टचे बटन हे उजवीकडे आणि महिलांना शर्टचे बटन खोलण्यासाठी उजवा हाताचा वापर होतो म्हणून त्यांच्या कपड्यांना बटन हे डावीकडे असते. दुसरे कारण : महिलांच्या शर्टचे बटन हे पुरुषांच्या शर्टच्या विरुद्ध बाजूस का असन्याचे दुसरे कारण हे आहे कि, अगोदर पुरुष आपले कपडे स्वतः घालत होते पण महिलांना कपडे घालण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती. ह्याच कारणामुळे महिलांच्या कपड्याचे बटन हे डावी बाजूस लावलेले असते, जे आज सुद्धा असच आहे.तिसरे कारण : पुरुषांच्या शर्ट चे बटन नेहमी उजव्या बाजूस व महिलांच्या शर्टचे बटन हे डाव्या बाजूस लागण्यामागे तिसरे कारण असे आहे कि, सुरुवातीपासूनच महिलांच्या व पुरुषांच्या कपड्यांमध्ये विविधता आढळते. पण वेळेनुसार गोष्टी बदलू लागल्या आहेत आणि कपडे घालण्याची पद्धत हि समान होऊ लागली आहे. महिला व पुरुषांच्या कपड्यांमध्ये काहीतरी अंतर ठेवण्यासाठी असे केले आहे. चौथे कारण : ह्या मागील चौथे कारण हे थोडेसे इतिहासासोबत जुळले आहे. ऐतिहासिक तथ्यांनुसार महिलांच्या कपड्याची बटणे डावीकडे लावण्यासाठी नेपोलियन बोनापार्टने आदेश दिला होता. ह्यामुळे नेपोलियन नेहमी आपला एक हाथ शर्टमध्ये टाकून उभे राहतात व ह्यामुळे काही महिलांनी एकदा त्यांची खिल्ली उडवली होती आणि ह्याच गोष्टीमुळे नाराज होऊन नेपोलियन बोनापार्टने महालांच्या शर्टचे बटन हे डावीकडे लावण्याचा आदेश दिला होता, जे आज पण तसेच आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *