Home / कला / बिग बॉस च्या घरातून शिवानी ला हाकलले

बिग बॉस च्या घरातून शिवानी ला हाकलले

मित्रानो हिट रिऍलिटी शो हिंदी बिग बॉस नंतर मराठी बिग बॉस सीजन १ येऊन गेले व आता मराठी बिग बॉस सीजन २ सुरु आहे. यामध्ये विना, शिवानी, अभिजित असे कितीतरी लोक राहतात. अनेकांचा आवडता शो बिग बॉस झाला आहे. सलमानच्या शो नंतर हा मराठी बिग बॉस आल्याने तो लोक आवडीने पाहतात. सतत भांडण होणाऱ्या या घरात शिवानीला मागच्या वेळी राहण्यास अपात्र ठरवले होते मात्र त्यांना वार्निंग देऊन सोडून दिल. सतत अनेक कारणांमुळे चर्चेत असलेली शिवानी आता बिग बॉस मराठी मध्ये दिसणार नाही.

शिवाणीने सतत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहण्यास नकार दिला. शिवानी म्हणाली, “सतत होणारी भांडणे यामुळे मला राग येतो व त्याचा परिणाम माझ्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होत आहे.” याच कारणामुळे ती बिग बॉस याना सांगत होती मला घराबाहेर काढा नाहीतर मी कायदेशीर कार्यवाही करेल. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विक एंडच्या टास्कमध्ये शिवानीला घराबाहेर काढण्यामागचे कारण विचारले होते. तेव्हा तिने होणार त्रास सांगून राहायचं नसल्याचं व्यक्त केलं.मांजरेकरांनी माधव देवचके आणि विद्याधर जोशींना चांगलेच खडसावले कारण शिवणीची इच्छा नसताना देखील ती राहत होती. शेवटी महेश मांजरेकरांनी निर्णय घेऊन शिवानी सुर्वेला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर काढले. मग प्रश्न पडला असेल कि आता कास होईल तिची जागा कोण घेईल तर, हिना पांचाळ हिची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झालेली असून तीच शिवणीच्या जागी असणार आहे. अनेकांना शिवानीला बाहेर पाठवू वाटत असेल तर अनेक तिचे चाहते असतील मात्र तुम्ही कमेंट्स करून आपलं मत व्यक्त करू शकता.

Check Also

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.