NMJOKE

पार्ले बिस्किटाचे मालक कोण आहेत पहा, पार्ले कंपनीने भारतावर उपकार केल्यासारखे वाटेल

मित्रानो भारत पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्यामुळं गुलामगिरीतच भारतीयांचं जीवन गेलं. १९४७ भारत स्वतंत्र होण्यापूर्वी श्रीमंत फक्त ब्रिटिश होते आणि काहीच भारतीय. भारतातील जनता मात्र गरिबीतच जीवन व्यतीत करत होती. भारतात विदेशी वस्तू विकल्या जात होत्या, त्यांच्या किमती देखील जास्त होत्या त्यामुळे फक्त श्रीमंत लोकच त्यांचा आनंद घेत होते. त्यावेळी परदेशातून चॉकलेट भारतात आले मात्र ते देखील श्रीमंतांना परवडेल इतके महाग होते. हे पाहून भारतातील मोहनलाल दयाल याना वाईट वाटले.

मोहनलाल दयाल यांनी ठरवले होते ली ते भारतीयांसाठी भारताचं स्वदेशी चॉकलेट आणतील ज्यामुळे भारतीय गोरगरीब जनता देखील चॉकलेट चा आनंद घेऊ शकतील. यासाठी ते जर्मनीला गेले आणि तिकडे त्यांनी चॉकलेट बनवणं शिकलं. १९२९ साली त्यांनी ६०००० रुपयांना कॅण्डी मेकर मशीन विकत घेतली आणि तिला भारतात घेऊन आले. स्वतः रेशनींग दुकान असून त्यांनी भारतीय जनतेला चॉकलेटचा आनंद मिळावा यासाठी त्यांनी नवीन व्यापार सुरु केला. त्यांनी मुंबईतील पार्ला या ठिकाणी एक गोडाऊन विकत घेतले. कंपनीची सुरवात करताना फक्त १२ कर्मचारीच काम करत होते आणि ते देखील मोहनलाल यांच्या घरचेच सदस्य होते. कंपनीला नाव सुचत नव्हते म्हणून त्याला जागेच्या नावावरूनच नाव सुचवले. पार्ला या ठिकाणी कंपनी असल्याने त्यात बदल करून “पार्ले” असे कंपनीचे नाव ठेवण्यात आले. सुरुवातीला कंपनीत “ऑरेंज कँडी” हे चॉकलेट बनवून विकले जात होते. गरीब जनता देखील हे चॉकलेट विकत घेऊ शकत होती त्यामुळे भारतीयांना देखील चॉकलेट खाता आल्याने आनंद झाला. पुढे पार्ले ने अजून चॉकलेट बनवले मात्र इंग्रज चहासोबत बिस्कीट खात होते आणि ते देखील श्रीमंतच विकत घेऊ शकत होते. भारतातील गरीब जनतेला बिस्कीट खाता यावं यासाठी मोहनलाल यांनी “पार्ले ग्लुको” नावाचे बिस्कीट बनवले. गव्हापासून बनवलेलं हे बिस्कीट गरीब देखील विकत घेऊ शकतात त्यामुळे भारतीयांना खूपच आनंद झाला. यावरून भारताला चॉकलेट आणि बिस्किटे स्वस्तात देणारे आणि स्वदेशी असणारे पार्ले चे मालक मोहनलाल यांनी भरतीय जनतेवर उपकार केल्यासारखे नाही का.
Exit mobile version