NMJOKE

का अजूनही स्वस्त विकले जाते पार्ले जी बिस्कीट, इतक्या वर्ष्यांपासून किंमत वाढवली नसून कंपनीला कसा होतो फायदा

मित्रानो तुम्ही लहानपणापासून पार्ले जी बिस्कीट खात असाल. बिस्किटांमध्ये खूप जुनी कंपनी असणारी पार्ले जी कंपनीने अजूनही आपली किंमत वाढवली नाही तरीही कंपनीचा फायदा कसा होतो. तुम्ही ९० च्या दशकात पार्ले जी बिस्कीट विकत घेतल असेल तर तेव्हा ४ रुपयांना हा बिस्कीट पुडा मिळायचा आणि आता इतकी महागाई वाढून देखील ५ रुपये किंमत आहे. मग या महागाईत कंपनीला आपले बिस्कीट कसे इतके स्वस्त विकायला परवडते, कंपनीला फायदा होतो का, हे बिस्कीट का बंद होत नाही याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मागील २५ वर्ष्यांपासून पार्ले जी बिस्कीट विकत आहे मात्र त्यांनी आपल्या बिस्किटाच्या किमतीत वाढ नाही केली. एकदा पार्ले जी बिस्किटाने ५० पैसे वाढवले होते त्यावेळी त्यांचा खप फक्त ५० पैसे किंमत वाढल्याने खूपच कमी झाला. लोकांना असे वाटले जस काय पेट्रोल विकत घेत आहोत. २०१३ मध्ये या कम्पनीचा टर्नओवर ५००० करोड रुपये होता आणि २०१७-१८ मध्ये याचा टर्नओवर ८००० करोड रुपयांपेक्षा अधिक झाला ते हि किंमत न वाढवता. पार्ले जी ने हे बिस्कीट सर्वांच्या घराघरात पोहचवल्याने आपली ओळख निर्माण केली होती म्हणून ते बंद देखील केले नाही व कंपनीने शक्कल लढवली.पार्ले जी या बिस्किटातून कमी फायदा झाला तरी चालेल पण ते बंद होऊ द्यायचे नाही हे कंपनीने ठरवले मग तुम्ही म्हणाल पैसे कुठून कमावणार तर क्रॅक जॅक, मोनॅको, हाईड अँड सिक हे ब्रँड पार्लेचेच आहेत तिथून ते जास्त कमवतात. पार्ले जी बिस्किटातून मिळणार कमी फायदा ते इतर पार्ले ब्रँड च्या बिस्किटातून एड्जस्ट करतात. यासोबत पार्ले जी ने किंमत वाढवली नाही मात्र बिस्किटात मिळणारी कोन्टिटी कमी केली पूर्वी ४ रुपयात १०० ग्राम बिस्किटे यायची आता ५ रुपयात ६५ ग्राम येतात. यासोबत कंपनीने साधं प्लास्टिक कव्हर लावलं पूर्वी हे बिस्कीट दोन कव्हर मध्ये यायचं यामुळे पँकिंगचा खर्च कमी झाला. बिस्किटावर असलेला मुलीचा लोगो प्रसिद्ध असल्याने तो फेमस आहे म्हणून जाहिरात जास्त करावी लागत नाही याने जाहिरातीचा खर्च वाचला. तुम्ही जर या बिस्किटाचे फॅमिली पॅक घेतला तर त्यामध्ये असलेले बिस्कीटपुडे साध्या ट्रान्स्परन्ट प्लॅस्टिकने पाक केलेले असतात त्यामुळे तेथून देखील फायदा होतो. म्हणूनच आजही पार्ले जी बिस्कीट पूर्वीच्याच किमतीत विकत असून देखील टिकून आहे.
Exit mobile version