NMJOKE

ऑक्सिजन सिलेंडर सोबत UPSC परीक्षेत बसली विद्यार्थिनी, लहान पानापासून आहे या गंभीर ….

मेहनत केली तर फळ नक्की मिळते हे तुम्ही ऐकले असेलच आणि साक्षात पहिले देखील असेल. मोठे होऊन काहीतरी करून दाखवायचे स्वप्न असेल तर त्यासाठी तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. अनेक गरीब घरातील मुलांनी चांगला अभ्यास करून मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळवल्या आहेत, आपली ओळख निर्माण केली आहे. मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबातील मुलांना सर्व सुख सोयी, अभ्यासाची साधने, क्लासेस सर्व लावून देखील ते अभ्यासात मागे राहतात अशी देखील कितीतरी उदाहरणे आहेत. मात्र आज आपण एका वेगळ्याच मुलीबद्दल बोलणार आहोत.

केरळ मधील कोट्टयम येतेच राहणारी २४ वर्षीय लतिशा अन्सारी या मुलीविषयी आपण जाणून घेणार आहोत. होय लतिशा च्या जिद्दीला तिचा गंभीर आजार देखील हरवू नाही शकला. लतिशा गंभीर आजाराने त्रस्त असून देखील यूपीएससी ची परीक्षा द्यायला गेली. लतिशा ला पाहून अनेकांना दया येईल आणि ती आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लतिशा ने व्हीलचेर वर बसून ऑक्सिजन चा सिलेंडर लावून यूपीएससी ची परीक्षा दिली आहे. ती म्हणाली कि मागील एक वर्ष्यापासून ती याचा अभ्यास करीत आहे. लतिशा ला हाडांचा आजार आहे ज्यामुळे तिला नीट श्वास देखील घेता येत नाही. श्वास घेण्यासाठी ती ऑक्सिजन सिलेंडर वापरते, मात्र आत्मविश्वास कोणापेक्षा कमी नाही. लतिशा त्यांच्यासाठी जिवंत उदाहरण आहे जे सर्व काही असून देखील निराश आणि हताश झालेले आहेत. लतिशा ला कलेक्टर बनायचे आहे आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तिला जन्मल्यानंतर हाडांचा आजार “टाईप २ ऑक्सियोजिणेसिस इम्परफेक्ट” झाला होता. मात्र मागील एका वर्ष्यापासून तिला श्वासाचा आजार देखील झाला. त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर लागतोच. मिळालेल्या माहितीनुसार तिला मेडिकल ट्रीट्मेंसाठी महिन्याला २५००० रुपये लागतात.
Exit mobile version