वडिलांनी आपल्या दोन छोट्या मुलींना फेकले नदीत, नंतर एका तरुणाने मुलींना….

हिमाचल प्रदेशात एका वडिलांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना नदीत टाकून मारायचा प्रयत्न केला आहे. हि क्रूर घटना हिमाचल प्रदेशातील बंगना येथे घडली. चमकौर सिंह नावाच्या व्यक्तीने बोटीने आपल्या कुटुंबासोबत घरी जात असताना संधी मिळताच स्वतःच्या दोन मुलींना बोटीतून खाली फेकले. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी हे सांगितले आहे. हि घटना लाठीयानी नावाच्या ठिकाणी घडली. पंजाब मध्ये राहणार चमकौर सिंह आपला भाऊ, पत्नी दोन मुली आणि एका मुलासोबत हिमाचल प्रदेशात आला होता.

हिमाचल प्रदेशात बाबा बालक नाथ मंदिर दियोटसिद्ध चे दर्शन घेण्यासाठी चमकौर सिंह आणि त्याच कुटुंब आलं होत. दर्शन झाल्यानंतर लाठीयानी नावाच्या ठिकाणाहून ते बोटीत बसून घरी चालले होते. त्याच वेळी चमकौर सिंह ने आपल्या मुलींना बोटीतून पाण्यात फेकले. मुलींना पाण्यात फेकताना एक तरुण सुनील कुमार ने पहिले आणि त्याने पाण्यात उडी मारून त्या दोन मुलींना वाचवले. या घटनेला पाहून तिथे असणाऱ्या उपस्थित लोकांनी चमकौर सिंह च्या कुटुंबाला पकडले आणि आरोपी चमकौर सिंह ला खूप मारू लागले.वडिलांना मारताना पाहून दोन्ही मुली रडू लागल्या आणि वडिलांना सोडवू लागल्या त्यामुळे लोकांनी त्यांना मारणं थांबवलं. यानंतर लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी येऊन त्यावेळी आरोपी चमकौर सिंह याना ताब्यात घेतले व त्याच्या घरच्यांना विचारले कि त्याने असं का केलं तर चमकौर सिंह हा डोक्याने बालिश असल्याचं सांगितलं. त्यावर पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट आणायला सांगितले मात्र कुटुंबीयांकडे असा मेडिकल रिपोर्ट नव्हताच. त्यामुळे चमकौर सिंह ला तुरुंगात टाकले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *