क्रिकेटच्या मैदानात घाम गाळत आहे सैफ अली खान चा मुलगा, पहा काय करायचे आहे त्याला

बॉलिवूड चा नवाब सैफ अली खान ची मुलगी एकाबाजूला चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालत आहे तर दुसरीकडे सैफ अली खान चा मुलगा इब्राहिम क्रिकेटच्या मैदानात घाम गाळत आहे. होय सैफ चा मुलगा क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहत आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून इब्राहिम क्रिकेटच्या मैदानात घाम गाळून क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटमध्ये मुलाची रुची पाहून सैफ देखील त्याला प्रोत्साहित करून सपोर्ट करीत आहे. मुलाला एक चांगला खेळाडू बनवण्यासाठी सैफ देखील प्रयत्न करत आहे.

आपले वडील सैफ अली खान प्रमाणे अभिनेता नाही तर आजोबा मन्सूर अली खान पटौदी प्रमाणे क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहत आहे. इब्राहिम फक्त स्वप्नच पाहत नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहे. इब्राहिम ला ऍक्टिंग मध्ये रस नाही म्हणून तो आपल्या कोच ला घेऊन क्रिकेट खेळत आहे. मुलाला प्रोत्साहन मिळावं यासाठी सैफ स्वतः मैदानात जातो आणि इब्राहिम ची क्रिकेट विषयी असणारी रुची आणखीन वाढवतो. इब्राहिम आता फक्त १८ वर्ष्यांचा आहे.सैफ टाळ्या वाजवून इब्राहिम चे कौतुक करतो जेव्हा तो चौका छक्का मारतो. काही दिवसांपूर्वी क्रिकेट मॅच दाखवायला सैफ आपल्या मुलाला क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये घेऊन गेला होता. सारा आणि इब्राहिम दोघंही मुलांचं आपलं सावत्र आई करीना सोबत चांगलं ट्युनिंग आहे. अनेक पार्टींमध्ये तिघांना एकत्र पाहायला मिळालं आहे. करीना तितकंच प्रेम सारा आणि इब्राहिम वर करते जितके ती तैमूर वर करते. पुढे जाऊन इब्राहिम चांगला खेळाडू बनतो का कि दुसऱ्याच कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर करतो हे तर वेळच सांगेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *