इन्स्पेक्टर झाला नेता, पण डीएसपी ला पाहताच केला सलाम

आंधरप्रदेशात तेलगू देशम पार्टी ला मागे टाकून वाईएसआर कांग्रेस ने सत्ता घेतली. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत वाईएसआर कांग्रेस ने चांगलं प्रदर्शन केलं. आंधरप्रदेशात हिंदूंपुर लोकसभेच्या जागेवर वाईएसआर कांग्रेस चे गोरंता माधव याना विजय मिळाला. गोरंता माधव हे एक इन्स्पेक्टर होते आता ते खासदार झाले आहेत. अश्यातच गोरंता माधव याचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. वायरल फोटो ला पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या फोटोमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया.

तुम्ही पूर्वी असा फोटो पहिला नसेल ज्यामध्ये एखादा नेता किंवा खासदार डीएसपी ला सलाम करेल. मात्र या फोटोत खासदार गोरंता माधव हे आपल्या अगोदरच्या डीएसपी ला सलाम करत आहेत. नेत्याला सॅल्यूट करताना पाहून डीएसपी ने देखील गोरंता माधव याना सलाम केले. द वीक च्या बातमीनुसार हा फोटो पोलिंग सेंटर चा आहे. जेव्हा तिथे काउंटिंग सुरु होती तेव्हा गोरंता माधव यांची भेट डीएसपी शी झाली. जेव्हा गोरंता माधव याना विचारले गेले कि त्याने सॅल्यूट का केला तेव्हा माधव म्हणाले.गोरंता माधव म्हणाले, “मी अगोदर डीएसपी याना सॅल्यूट केलं नंतर त्यांनी देखील मला सॅल्यूट केलं. मी त्यांना खूप मानतो आणि आमच्यात परस्पर सम्मान आहे.” माधव यांनी मोठे पद मिळवले असले तरी ते आपल्या अगोदरच्या आदरणीय व्यक्तीला विसरले नाहीत, यावरून त्यांचं चांगलपं देखील दिसून येत. गोरंता माधव आता आपल्या जिल्ह्यात काय काय प्रगती करतात हे नंतर कळेलच मात्र तोवर त्यांना निवडून आल्याबद्दल शुभेच्या. दिवाकर रेड्डी ने पोलीस फोर्स वर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिले होते त्यानंतर राजकरणात उतरण्याचा निर्णय माधव यांनी घेतला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *