Home / बातम्या / महिलेला झाले एकत्र ४ मुलं, डिलेव्हरी नंतर ….

महिलेला झाले एकत्र ४ मुलं, डिलेव्हरी नंतर ….

मित्रानो एखादी आई गर्भवती असेल तर चिमुकलं बाळ घरात येणार म्हणून सर्व आनंदी असतात. अश्यावेळी जर का एका पेक्षा अधिक मुलं एकत्र झाली तर आणखीन आनंद होतो. तुम्ही आजवर दोन मूळ एकत्र झालेलं पाहिलं असेल आणि असं अनेकदा पाहायला मिळत. मात्र एकत्र तीन, चार किंवा त्याहून जास्त मुलं झालेलं खूप कमी पाहायला मिळत. एखाद्या स्त्री साठी आपण आई झाल्याचा आनंद गगनात मावणार नाही इतका असतो. अश्यावेळी जर एकत्र चार मुलं झाली तर ते आई वडील किती खुश होतील.

अनेकांना हे चांगलं देखील वाटत तर काहींना त्यांना पालन पोषण करण्याचा प्रश्न असतो. लखनऊ मध्ये एक अशी घटना घडली आहे कि महिलेने एकत्र चार मुलांना जन्म दिला आहे ज्याचे फोटो खूप वायरल होत आहेत. मेजापूर गोंडा येथे राहणारा जियाउल हक याची पत्नी रेहाना हि गर्भवती होती. डिलेव्हरी साठी रेहाना ला लखनऊ सीतापूर हायवेवर असणाऱ्या हर्षा हॉस्पिटल मध्ये दाखल केलं होत. चार मुलं असल्याने नॉर्मल डिलेव्हरी होणं शक्य नव्हतं म्हणून डॉक्टरांच्या टीमने मोठं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.महिलेसोबत चार मुलांचा जीव वाचवणे हे डॉक्टरांसाठी देखील अवघड होत मात्र डॉक्टरांनी व त्यांच्या टीमने ते ऑपरेशन पूर्ण केले व डिलेव्हरी झाली. आनंदाची बातमी हीच आहे कि प्रसूतीनंतर चारही मुलं आणि आई अगदी स्वस्थ होते. या चार मुलांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. रेहाना चा पती मुंबईत लिफ्ट बनवायच्या कंपनीत कामाला आहे. रमजान महिन्या मध्ये त्याला चार मुलं झाल्याने तो देखील खुश आहे. जसे त्यांचा जन्म झाला तसेच त्यांचं पालन पोषण देखील अल्लाह करेल असं त्याच म्हणणं आहे. सध्या या गोंडस बाळाचा फोटो खूप वायरल होत असून तो तुम्ही देखील पाहू शकता.

Check Also

आयसीसी चा मोठा निर्णय, नो बॉल मुले नाही होणार आता वाद

मित्रानो भारतातच नव्हे तर भारत बाहेर देखील क्रिकेट या खेळाचे लाखो चाहते आहेत. नुकतीच वर्ल्ड …

Leave a Reply

Your email address will not be published.