गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्यांचा झाला….

मित्रानो आजच्या आधुनिक युगात कम्प्युटर आणि स्मार्ट फोन ने खूपच प्रगती केली आहे. अगदी लहान बाळ देखील युट्युब अथवा मोबाईल मध्ये रमून जात आणि रडणं थांबवत. मोबाईलमध्ये इंटरनेट आणि विविध एप्स असल्याने लहान चिमुकल्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचच मनोरंजन होत, मात्र याचे जीवघेणे नुकसान देखील आहेत. काही दिवसांपूर्वी ब्लूव्हेल या गेम मुळे अनेक मुले आत्महत्या करू लागली होती. आता पबजी हि गेम खूपच जास्त प्रमाणात वायरल असून ती संपूर्ण जगात खेळली जाणारी गेम आहे.

पबजी गेम मुळे मुलं इतकी वेडी झाली आहेत कि तासंतास ते मोबाईल खेळात बसतात. पबाजीच नाही तर अनेक गेम्स मुळे मोबाईल गरम होतो आणि स्फोट होतो. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरात मोबाईलचा स्फोट झाल्यानं एका दहावीच्या विद्यार्थ्यांचा झाला डोळा निकामी. अमोल पाटील नावाच्या १६ वर्ष्याच्या मुलाचा डोळा जखमी होऊन निकामी झाल्याचं समोर आलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणं तो आजही मोबाईलवर गेम खेळत होता. अमोल पाटील कागल तालुक्यातल्या उंदरवाडीचा रहिवासी आहे. गेम खेळताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला आणि त्यामुळे मोबाईलचे काही तुकडे त्याच्या डोळ्यावर लागल्याने तो जखमी झाला. अजूनही त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोबाईल जास्त गरम झाल्यावर तो वापरू नये तसेच जास्त वेळ मोबाईलमध्ये गेम खेळून देखील दृष्टी कमी होण्याची श्यक्यता असते त्यामुळे जास्त वेळ त्यात न घालवता काळजी घेणे योग्य राहील. गेम मध्ये अनेक मुलं हरवून जातात त्यामुळे मुलांकडे लक्ष देणे हि देखील पालकांची जवाबदारी आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *