आता आता : भारतीय सैनिकांनी केले दोन दहशतवादी ठार

१४ फेब्रुवारी ला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांनी चोख उत्तर पाकिस्तानला दिले. मात्र त्यानंतर भारत आणि पाकिस्तानात अनेक चकमकी होत असल्याने तणावाचे वातावरण दोन्ही देशांमध्ये आहे. अजूनही भारत आणि पाकिस्तान चकमकी होतच आहेत आणि यामध्ये अनेक सैनिक मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात. शुक्रवार दिनांक ३१ मे २०१९ रोजी पुन्हा जम्मू काश्मीरच्या त्राल येथे दहशतवादी हल्ला झाला. येथे सीआरपीएफ १८० बटालियनच्या कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी देखील चोख उत्तर दिले आणि आपल्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. जे दोन दहशतवादी ठार केले त्यातून एक स्थानिक तर दुसरा परदेशी दहशतवादी होता. जेथे हा गोळीबार झाला तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशतवादी आणि सैनिकांमध्ये चकमकी होत असल्याने तेथील सुरक्षा तेव्हापासूनच वाढवली गेलेली आहे. शुक्रवारीदेखील किश्तवाड येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.किश्तवाड मध्ये झालेल्या चकमकीमध्ये देखील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं होत. मात्र यामध्ये दोन पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले होते. सतत चकमकी होत असल्या तरीही भारतीय सैनिक व पोलीस त्यांना चोख प्रतिउत्तर देत आहेत. जवळपास गेल्या पाच महिन्यात १०१ दहशतवाद्यांचा खात्मा सैनिकांनी केला असून त्यामध्ये ७६ स्थानिक दहशतवादी आणि २५ परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारतीय सैनिकांच्या या कामगिरीला सलाम.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *