विनोद : रस्त्याच्या कडेला “जेसीबी” ने सुरु होत काम, तरीही लोक बघायला आले नाहीत म्हणून ड्राइव्हरला आला राग

मित्रानो सध्या जेसीबी चे अनेक जोक वायरल होत आहेत त्या विनोदाचा भाग म्हणूनच हि एक विनोदी पोस्ट तयार केली गेलेली आहे. या कथेचा खऱ्या घटनेशी कोणताही समंध नसून हि फक्त विनोद म्हणून पोस्ट केलेली आहे. जेसीबी च काम सुरु असेल आणि तिथे गर्दी होणार नाही असे होणार नाही. सध्या सोशल मीडियावर जेसीबी चे अनेक जोक वायरल होत आहे त्यात एक चमत्कार घडलयसारखंच आहे. काल सायंकाळी जेसीबी ने काम सुरु होत मात्र तेथे काम सुरु असून देखील खोदकाम पाहायला कोणी आले नाही. एक तास काम सुरु असून देखील कोणीच खोदकाम पाहायला आले नाही म्हणून जेसीबी ड्राइव्हर मनोज याला राग आला आणि त्याने काम बंद केलं.

मनोज ची मागणी आहे कि जोपर्यंत तिथे दहा-वीस लोक त्याच काम पाहायला येत नाहीत तोपर्यंत तो काम करणार नाही. मनोज म्हणाला कि, मला इथलं खड्डा खोदण्याचा काम मिळालं आहे मात्र मी काम सुरु करून देखील लोक काम पाहायला येत नाहीत. मी जिथे काम करायला जातो तिथे जेसीबी चालू केल्यावर लगेच वीस लोक तरी गर्दी करतात. आता माझी काही चूक झाली आहे का? माझ्या वीस वर्ष्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा इथे असं घडलं आहे कि माझं काम पाहायला लोक आली नाहीत.काल ४-५ लोक काम पाहायला आली होती मात्र पाच मिनिटे नजारा पाहून निघून गेली. आता मला असं वाटत आहे कि लोकांकडे आता वेळ नाही, मोदीजींनी सर्वाना रोजगार सुरु केला आहे कि काय. मनोज चा जेसीबी विषयीचा हा विनोद तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. सध्या जेसीबी चा ट्रेंड सुरु आहे आणि जेसीबी चे काम पाहायला गर्दी असतेच त्यामुळेच आम्हाला असा कथेच्या स्वरूपात विनोद तुम्हाला सांगू वाटला. जेसीबी चे अनेक विनोद तुम्ही पाहत असालच त्यातच हि एक भर टाकून मनोरंजन करण्याचा प्रयत्न.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *