पबजी गेम मुळे झाला १६ वर्ष्याच्या मुलाचा मृत्यू

मित्रानो आजच्या आधुनिक युगात कम्प्युटर आणि स्मार्ट फोन ने खूपच प्रगती केली आहे. अगदी लहान बाळ देखील युट्युब अथवा मोबाईल मध्ये रमून जात आणि रडणं थांबवत. मोबाईलमध्ये इंटरनेट आणि विविध एप्स असल्याने लहान चिमुकल्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचच मनोरंजन होत, मात्र याचे जीवघेणे नुकसान देखील आहेत. काही दिवसांपूर्वी ब्लूव्हेल या गेम मुळे अनेक मुले आत्महत्या करू लागली होती. आता पबजी हि गेम खूपच जास्त प्रमाणात वायरल असून ती संपूर्ण जगात खेळली जाणारी गेम आहे.

पबजी गेम मुळे मुलं इतकी वेडी झाली आहेत कि तासंतास ते मोबाईल खेळात बसतात. काही जण तर पूर्ण दिवस रात्र गेम खेळात असतात त्यामुळे अनेकांनी पबजी वर बंदी आणण्याची मागणी केली होती मात्र प्रत्यक्ष बंदी न आणता ६ तास रोज पबाजी खेळू शकतो असा नियम आणला गेला. या गेम मुळे एका १६ वर्ष्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. फुरकान नावाचा इयत्ता बारावी मध्ये शिकणारा १६ वर्षीय मुलगा मागील एक दीड वर्ष्यांपासून मोबाईल मध्ये गेम खेळायचा. त्याला गेमचे खूप वेड होते घरच्यांनी अनेकदा नको खेळत जाऊ असे देखील सांगितले मात्र तरीही तो खेळात असे.फुरकान चे वडील हारून राशिद मध्य प्रदेश मधील नीमच मध्ये राहतात. त्यांच्या नातेवाईकच २६ मे २०१९ रोजी लग्न असल्याने अगोदरच त्यांच्या घरी गेले होते. २६ तारखेला रोजप्रमाणे फुरकान पबाजी खेळत होता निम्म्यारात्री २ वाजेपर्यंत तो खेळला नंतर झोपला. दुसऱ्या दिवशी २७ तारखेला तो १२ दुपारी वाजता पबजी खेळू लागला. संध्याकाळी ५ वाजले तरी तो खेळात होता अचानक त्याच्या गेममधील साथीदाराला मारताना पाहून तो ओरडू लागला त्यावेळी त्याची बहीण फिजा त्याच्या सोबत होती. अचानक त्याने हेडफोन काढले, जोरात ओरडू लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरकडे नेले मात्र तो त्यापूर्वीच जग सोडून गेला होता. फुरकान च्या घरचे गेम बंद करण्याची मागणी करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *