NMJOKE

हे आहेत देशातले सर्वात गरीब खासदार, लोक म्हणतात ओडिशातील मोदी

मित्रानो आपल्या भारतात अनेक आमदार, खासदार असे अनेक मोठे नेते आहेत जे विविध क्षेत्रातून आलेले आहेत. अनेक अभिनेत्र्या देखील नेत्या झाल्या आहेत आणि अनेक अभिनेते देखील नेते झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला ओडिशाच्या अश्या नेत्याबद्दल सांगणार आहोत जे सर्वात गरीब असून खासदार आहेत. ओडिशातील बालशोर लोकसभा मतदारसंघातून प्रचापचंद्र सारंगी भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. प्रचापचंद्र बीजेडीच्या रविंद्र कुमार जेना यांना १२,९५६ मतांनी हरवलं.

मागच्या पाच वारश्याखाली २०१४ ला प्रचापचंद्र याना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता २०१९ मध्ये प्रचापचंद्र विजयी झाले व खासदार म्हणून निवडून आले. आर्थिक परिस्तिथी हळदीची असून ते अजूनही झोपडीत राहतात. प्रचापचंद्र यांनी लग्न देखील केलेले नाही. त्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे ओडिशा चा मोदी म्हणून देखील त्यांना म्हटले जात आहे. साधू बनायचं स्वप्न असणारे प्रचापचंद्र रामकृष्ण मठात गेले होते मात्र त्यांना वडील नसल्याने माठातील लोकांनी त्यांना आईची सेवा करण्यास सांगितले.अजूनही सायकलवरून प्रवास करणारा हा खासदार खूप मोठ्या मनाचा माणूस आहे. प्रचापचंद्र यांनी बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी भागात शाळा देखील बांधल्या आहेत. प्रचापचंद्र आणि मोदीजी यांची जवळची मैत्री आणि ओळख आहे त्यामुळेच कि काय नरेंद्र मोदीजी नेहमी ओडिशाला गेल्यावर प्रचापचंद्र सारंगी यांची भेट घेतात. आपल्या भारतात असे खूपच कमी नेते आहे जे निस्वार्थीपणे जनतेची सेवा करतात. नेतेच नाही तर दयाळू लोक देखील भारताला लाभले आहेत ज्यांनी जनतेसाठी खूप काही केलं आहे. प्रचापचंद्र सारंगी सारख्या थोर नेत्याला उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून जनकल्याण होवो हीच सदिच्छा.
Exit mobile version