धक्कादायक : निर्मात्याने श्रुतीला चित्रपटात घेण्यासाठी दिली होती एका रात्रीची ऑफर

मित्रानो मुंबईत अनेक तरुण मुलं मुली स्टार बनण्यासाठी येत असतात. सर्वाना मोठा हिरो हिरोईन व्हायचं असत मात्र खूप कमी लोकच असतात जे हे स्वप्न पूर्ण करतात. अनेक मुली अभिनेत्री बनण्यासाठी काहीही करायला तयार असतात मात्र काहींना आपल्या अभिनयाने जिद्दीने पुढे जायचे असते. तरुण मुली काही विचार न करता आपलं शरीर इतरांना देऊन बसतात व त्यांची फसवणूक होते. तनुश्री दत्ता नंतर मीटू मोहीमच जणू राबवली जात आहे. अनेक अभिनेत्र्यांनी आपल्यासोबत घडलेले जुने अनुभव शेअर केले आहेत त्यात मराठमोळ्या श्रुती मराठेने देखील भर टाकल्यासारखे आहे.

श्रुती मराठेने ह्युमन ऑफ बॉम्बेच्या इन्स्टा पेजवर आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. श्रुती म्हणाली, “एकदा एका निर्मात्याने मला एक मुख्य भूमिका देऊ केली. सुरुवातीला तो मला फार प्रोफेशनल वाटला. पण काही दिवसांनी त्याने वन नाइट स्टँड, सामंजस्य असे शब्द वापरायला सुरुवात केले. मात्र श्रुतीने त्यावेळी शांत न राहता उत्तर दिले कि, ज्या प्रकारे तुम्ही माझ्यासोबत वन नाइट स्टँड करू इच्छिता तसेच माझ्यासोबत काम करणाऱ्या हिरो सोबत देखील वन नाइट स्टँड कराल का?”श्रुतीने दिलेलं उत्तर ऐकून निर्मात्याला धक्का बसला. श्रुती पुढे म्हणाली कि, “मी दाक्षिणात्य चित्रपटांसाठी बिकनी घातली मात्र मला सिनेमात काम करायला मिळत आहे म्हणून मी बिकनी घातली.” श्रुतीच्या मते जेव्हा आपल्यासोबत असा प्रकार घडतो तेव्हाच आपण उत्तर देणं गरजेचं आहे. नंतर मीटू सारखे प्रकार करून आरोप करण्यात अर्थ नाही. माझ्यासोबत अशी घटना घडून तीन वर्षे झाले आहेत मात्र मी त्याला तेव्हाच प्रतिउत्तर दिले आणि त्यानंतर इतरांना देखील मी हि गोष्ट सांगितली ज्यामुळे त्याला हा प्रोजेक्ट सोडावा लागला. श्रुतीच्या धाडसामुळे हे सर्व घडले आणि त्याला प्रोजेक्ट सोडायला लागला श्रुतीच्या या धाडसाला सलाम.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *