दोन करोड च्या ऑफरला नाकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगितलं कारण, “मी भारतीय आहे आणि….

मित्रानो असे अनेक मोठे अभिनेते आहेत ज्यांनी काही कारणास्तव सिनेमे, चित्रपट, मालिका, जाहिराती स्वीकारल्या नाहीत. त्या न स्वीकारल्याने अनेकांना नंतर दुःख हि झाले तर अनेकांना चांगले देखील वाटले. अशीच एक साऊथ ची अभिनेत्री साई पल्लवी हिने देखील २ करोड रुपयांची ऑफर स्वीकारली नाही मात्र तिने ती ऑफर का नाही स्वीकारली हे तिने नंतर सांगितले. साई पल्लवी ने चित्रपट फिदा मध्ये काम करून साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले होते. साई पल्लवी टीएसएमयू मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होती.

जेव्हा ती शिक्षण पूर्ण करत होती तेव्हा २०१४ मध्ये निर्देशक अल्फोंज पुथरिन ने साई पल्लवी ला चित्रपट ‘प्रेमम’ मध्ये ‘मलार’ ची भूमिका करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तिला साऊथचा फिल्मफेयर अवार्ड देखील मिळाला. पल्लवी ला कोणी ओळखत नव्हते मात्र अचानक ती नावारूपाला आली. साई ला एक फेयरनेस क्रीम ची जाहिरात मिळाली होती यासाठी तिला २ करोड रुपयांची ऑफर मिळाली होती. इतकी रक्कम जाहिरातीची मिळणार असून देखील तिने ती स्वीकारली नाही आणि त्यामागचे कारण देखील तिने सांगितले.फेयरनेस क्रीम ची जाहिरात का नाही केली याचे कारण अभिनेत्री साई पल्लवी ने सांगितले कि, मी एक भारतीय आहे आणि मला माझा असलेला रंग चांगला आहे. पल्लवी च म्हणणं आहे कि अश्या जाहिराती लोकांना आणि खासकरून महिलांना चुकीचा संदेश देतात. यामुळेच ती अशाप्रकारच्या कोणत्याही कॅम्पेन चा हिस्सा बनू शकत नाही. पल्लवी ला तिचा चेहरा जसा आहे तास लोकांसमोर दाखवायला आवडते ती जास्त मेकअप करत नाही आणि यामुळेच ती इतकी प्रसिद्ध झाली आहे. पल्लवी ‘सिंघम’ ची भूमिका निभावणारा अभिनेता सूर्या सोबत ‘एनजीके’ मध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *