इंग्लिश मध्ये सांगू का म्हणाऱ्या आर्चीच इंग्लिश आहे कच्च, बारावीत इंग्रजीत मिळाले इतके मार्क

एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच बारावी पास झाली आहे. सैराटमुळे ती नावारूपाला आली तिचा “मराठीत सांगितलेलं काळात नाही का? इंग्लिशमध्ये सांगू” हा डायलॉग सर्वाना माहीतच असेल मात्र खऱ्या आयुष्यात आर्चीच म्हणजेच रिंकू राजगुरूंच्या इंग्रजी कच्च असल्याचं तिच्या बारावीमध्ये पडलेल्या इंग्रजीच्या मार्कांवरून दिसून येत. रिंकूला ६५० पैकी ५३३ गुण मिळाले आहेत. इतके जास्त मार्क पडून देखील रिंकू कोठे मागे पडली तर इंग्रजी विषयात ती मागे पडली आहे.

रिंकू राजगुरूला मराठीमध्ये ८६, इतिहासात ८६, भूगोल मध्ये ९८, राज्यशास्त्रात ८६, अर्थशास्त्र ७७, पर्यावरण स्टडी मध्ये ७७ असे मार्क मिळाले आहे आणि इंग्रजी विषयात ५४ गुण मिळाले आहेत. इंग्रजी विषयात तिला सर्वात कमी गुण असून इतर सर्व विषयांमध्ये तिने चांगले मार्क मिळवले आहेत. टक्केवारी पाहता तिला ८२ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली आहे. रिंकूला चांगले मार्क्स मिळाल्याने तिचे सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे. मात्र तिचा चित्रटातील डायलॉग इंग्लिश मध्ये सांगू का या मुले ती ट्रॉल होत आहे.ट्रॉल होण्यामागचं कारण हेच आहे कि, सर्वाना इंग्लिश मध्ये सांगू का म्हणणारी आर्ची इंग्लिश विषयातच मागे पडली. मात्र रिंकू राजगुरूंच्या जिद्दीला सलाम करावे लागेल कारण कमी वयात तिने इतके नाम कमावले व तिचा नवीन चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तसेच आगामी चित्रपट “मेकअप” चे देखील शूटिंग सुरु आहे. रिंकूला तिच्या भावी वाटचालीसाठी आणि उत्तम मार्क्स मिळवून पास झाल्याबद्दल अभिनंदन. पुढे ती कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेईल हे नंतर कळेलच मात्र तोपर्यंत तुम्ही तिचा “मेकअप” चित्रपटाचा ट्रेलर पाहू शकता युट्युब वर.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *