“साथ दे तू मला” मालिकेतून काढल्यावर काय म्हणाली पहा

मित्रानो अनेक मालिका येतात आणि जातात मात्र काही अश्या मालिका असतात ज्या अनेकांना खूप आवडतात व त्या प्रसिद्ध होतात. अनेकदा मालिकांमधून पात्रांना वगळले जाते आणि त्याऐवजी नवीन पात्रांना म्हणजेच कलाकारांना घेतले जाते. कलाकार बदलल्याने काहीजण मालिका पाहणे सोडतात कारण पूर्वी त्या पात्राची भूमिका बजावणारे कलाकार त्यांनाच ते शोभून दिसते. मात्र काही न सांगता कलाकारांना वगळणे असे अनेक मालिकांमध्ये घडले आहे “ललित २०५” मालिके मधून अभिनेता संग्राम समेळ ला वगळण्यात आले.

“लक्ष्मी सदैव मंगलम” मालिकेतून केतकी चितळे ला देखील काढून टाकण्यात आले. आता “साथ दे तू मला” या अनेकांच्या आवडत्या मालिकेत असणाऱ्या “प्राजक्ता” ची मुख्य भूमिका करणाऱ्या “प्रियंका तेंडोलकर” या अभिनेत्रीला देखील तडकाफडकी वगळण्यात आले. प्रियंकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत सांगितले कि, “मी हि सीरिअल स्वतःहून, स्वखुशीने सोडलेली नाही! हे सगळं प्रोडक्शन टीम मधल्या काही माणसांमुळे झालं आहे.” यापुढे देखील ती जे काही म्हणाली ते तुम्ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व थोडक्यात फोटोमधील स्क्रिनशॉट मध्ये पाहू शकता.एका पत्रकारांशी बोलताना प्रियंका म्हणाली कि, “मालिकेतून मला काढण्यात आल्याच मला दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीने मला काढण्यात आलं ते खटकणार आहे. प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल असतो. पण कोणतीही पूर्वसूचना मला का देण्यात आली नाही? मालिकेच्या निर्मिती टीमकडून अचानक मला सांगण्यात आलं ‘आपण काम इथेच थांबवू या’ हे कितपत योग्य आहे? तसेच असेही सांगण्यात आले कि, माध्यमांशी बोलताना “माझ्या वैद्यकीय कारणास्तव मी मालिका सोडतेय” असे सांगा. जे प्रियंका सोबत घडले ते इतरांसोबत व नवीन व्यक्तींसोबत घडू नये असे प्रियंकाला वाटते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *