अर्ध्या किमतीत मिळवा स्कुटी, हिरो कंपनीची धमाकेदार ऑफर

मित्रानो अनेक सण किंवा ऑफर च्या दिवशी वस्तूंमध्ये सवलत देऊन स्वस्त दिली जाते. अनेकजण सण असल्यावर टीव्ही, फ्रिज, गाडी अश्या अनेक वस्तू खरेदी करतात. मध्यमवर्गीय आणि गरीब जनता यांची वाट पाहत असते व तेव्हाच एखादी वस्तू खरेदी करते. अशीच एक मोठी सवलत आता मोठ्या नामांकित कंपनीने दिलेली आहे. देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प ने बायबॅक स्कीम सुरु केली आहे. या स्कीमद्वारे तुमच्याकडे असलेली जुनी बाइक किंवा स्कुटर कंपनीला तुम्ही विकू शकता.

तुम्ही दिलेल्या जुन्या गाडीच्या बदल्यात कंपनीकडून तुम्हाला जुन्या बाइक किंवा स्कूटरच्या किंमतीच्या ५७ ते ६५ टक्के पैसे परत मिळतील. इतकी चांगली ऑफर अजूनपर्यंत कोणत्याच कंपनीने दिलेली नाही. या ऑफरमध्ये जवळपास निम्म्या किमतीतच तुम्हाला स्कुटी विकत मिळते याशिवाय ग्राहकाने स्कुटी खरेदी केल्यानंतर CredR कडून एक बायबॅक प्रमाणपत्र दिले जाईल. याचा वापर स्कूटर खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंत करता येईल. यामध्ये मूळ फायदा आपल्याला पाहायला मिळतो.आपण विकत घेतलेली हिरोची नवी स्कुटी जर तुम्ही सहा महिन्यांपासून पाच वर्षांच्या आत कंपनीकडे विकायला गेल्यास तुम्हाला एक्स शोरूम किंमतीवर ६० टक्के हिशेबाने जवळपास 30 हजार रूपये परत मिळतील. अश्या हिशेबाने ग्राहकाने स्कूटरसाठी आपल्या जवळील फक्त वीस हजार रूपये खर्च केले. हि ऑफर हिरोच्या डेस्टिनी आणि प्लेसर या दोन स्कृतींसाठी आहे. प्लेसर हि गाडी अगोदर खूप चालत होती मात्र आता ती स्कुटी कोणी विकत घेत नाही. या गाडीची विक्री जास्त व्हावी यासाठी हि स्कीम सुरु केली असल्याची माहिती हिरो मोटोकॉर्पचे हेड मार्केटिंग सेल्स संजय भान यांनी दिली. सर्वानी या ऑफरचा लाभ घ्यावा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *