NMJOKE

अजय देवगण ने दिला आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मित्रानो २०१८ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांचं निधन झालं त्यामुळे बॉलिवूड शोक मध्ये होत. २०१९ मध्ये देखील काहींचे निधन झाल्याने बॉलिवूड शोक मध्ये आहे. नुकतेच दिग्गज अभिनेते यांचे वडील आणि स्वतः अभिनेते, प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक असणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले आहे. ‘क्रांती’ (१९८१), ‘सौरभ’ (१९७९) आणि ‘सिंहासन’ (१९८६) या सिनेमांत अभिनय करणारा कलाकार आज जग सोडून गेल्याने बॉलिवूड मध्ये शोककळा पसरली आहे.

बॉलिवूड चा सिंघम अभिनेता अजय देवगण यांच्यावर आज शोककळा पसरली आहे. आज दिनांक २७ मे २०१९ रोजी अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांचं आज निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अजय देवगण चे वडील वीरू हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. वीरू याना शेवटी अजयच्या ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी पाहण्यात आलं होत. त्यांना कामाशिवाय बाहेर जण पसंत नव्हताच तर ते पार्ट्याना देखील किंवा सार्वजनिक कार्यक्रमात देखील जात नव्हते त्यांना ते देखील आवडत नव्हते. वडिलांच्या निधनामुळे अजय देवगणने ‘दे दे प्यार दे’ सिनेमाचं प्रमोशन अर्ध्यावर सोडलं होतं. यानंतर त्याने संपूर्ण वेळ वडिलांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो. वीरू देवगन यांच्या पार्टीवाला ऍम्ब्युलन्स मधून विले पार्ले ला नेले गेले. दिनांक २७ मे २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता विले पार्ले येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले. यावेळी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, संजय दत्त, शाहरुख खान, सनी देओल आणि बॉबी देओल असे मोठे कलाकार हजार होते.
Exit mobile version