Home / माहिती / हे ५ बंगले आहेत भारताचे सर्वात महागडे बंगले

हे ५ बंगले आहेत भारताचे सर्वात महागडे बंगले

मुकेश अंबानी : भारतातच नाही तर पूर्ण जगात महागड्या बंगल्यांपैकी एक असणारा मुकेश अंबानी यांचा बंगला आहे. मुकेश अंबानी यांनी कमावलेल्या पैश्यांमधून सर्वात जास्त पैसे हा बंगला बनवण्यात खर्च केले आणि त्यांना हवा तसाच हा बंगला बनवला. या बंगल्याचे नाव “एंटीला” आहे व या बंगल्याची किंमत जवळपास १० हजार करोड रुपये असल्याचे सांगितले जाते. साऊथ मुंबईत असणाऱ्या मुकेश अंबानींच्या बंगल्यात २७ मजले असून ६ मजले तर पार्किंगचा आहे. यामध्ये जिम, थिएटर, स्विमिंगपूल अश्या सर्व सुखसोयी आहेत. ५ जणांसाठी जवळपास ६०० नोकर ठेवलेले आहेत.

जिंदल हाऊस : जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड चे चेअरमन नवीन जिंदल हे आता काँग्रेस पक्ष्याचे दिग्गज नेते देखील आहेत. यांचा बंगला दिल्ली मधील पॉश ठिकाणी आहे. ३ एकर जमिनीवर पसरलेला हा बंगला जवळपास १३० करोड रुपयांचा आहे. दिल्लीतील सर्वात महागडा बांगला यांचाच आहे. शाहरुख खान : १५० करोड रुपयांच्या बंगल्याचा मालक शाहरुख खान आहे. शाहरुखच्या बंगल्याचं नाव “मन्नत” आहे. या बंगल्यात मिनी थिएटर, बॉक्सिंग रिंग, स्टुडिओ आणि टेबल टेनिस कोर्ट या सुविधा मुख्यरुपात आहेत.रतन टाटा : टाटा ग्रुप चे पूर्व चेअरमन रतन टाटा यांचा बंगला जवळपास १४० करोड रुपयांचा आहे. हा बंगला खूपच आकर्षक असून त्याची सुंदर बांधणी केली गेलेली आहे. समुद्रकिनारी त्यांचा सुखसंपन्न असलेला बांगला खूपच सुंदर वाटतो. अनिल अंबानी : मुकेश अंबानी यांचा लहान भाऊ अनिल अंबानी यांचा बंगला देखील १० करोड रुपयांच्या आसपास आहे. मुंबईतील पाली हिल मध्ये असणारा अनिल अंबानींचा बंगला देखील आलिशान बंगल्यांमधून एक असणारा बंगला आहे.

Check Also

आठ लग्न केलेल्या या ६८ वर्ष्याच्या माणसाला त्याच्या तरुण गर्लफ्रेंड ने काय केले पहा

असं म्हणतात प्रेमाला वय नसतं, हीच गोष्ट समोर ठेवून ब्रिटनच्या रॉन शेफर्ड ने एका पाठोपाठ …

Leave a Reply

Your email address will not be published.