शेठ आणि साधू ची कथा, एकदा वाचाच

एका गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. व्याजाने पैसे देणे हे त्याचे मूळ काम होते. व्याजाने पैसे देऊन तो श्रीमंत झाला नाही तर ज्याने त्याचे पैसे परत दिले नाही त्याची जमीन तो हिसकावून घ्यायचा. अनेक जण पैसे परत करू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या जमिनी तो घेऊन टाके. शेठ खूप क्रोधी आणि लालची होता त्यामुळे कितीही पैसे असला तरी त्याला कमीच वाटत होता. त्याच्या क्रोधी स्वभावामुळे त्याची मुलं आणि पत्नी देखील त्याला घाबरत होते. पैसे संपत्ती असून देखील हा शेठ असमाधानी आणि अशांत होता त्यामुळे तो बेचैन असायचा.

एकदा त्याने आपण अशांत असल्याचं आपल्या मित्राला सांगितलं मला शांती हवी आहे, माझे मुलं-पत्नी देखील मला घाबरतात नीट बोलत नाहीत त्यावर मित्राने त्याला एका साधूचा पत्ता दिला व सांगितले कि यांच्याकडे तू जा त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे समाधान आहे. मित्र म्हणाला त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग कठीण आहे ते साधू जंगलात एका कुटीमध्ये राहतात. शेठ जंगलाकडे गेला तिकडे त्याला साधूची कुटी दिसली व तो कुटीजवळ पोहचला. कुटीमध्ये साधू आपल्या शिष्यांसोबत हसत असताना दिसले. शेठ ने विचार केला कि आपल्याकडे सर्वकाही सुखसोयी आहेत राहायला मोठं घर आहे यांच्याकडे काहीच नाही एका झोपडीत राहून हे इतके आनंदी कसे राहू शकतात. शेठ ने आपलं दुःख साधूला सांगितलं आणि त्याला मनाची शांती हवी आहे असे सांगितले. त्यावर साधू तेथून उठले व कुटीबाहेर गेले तेव्हा शेठ देखील उठून त्यांच्या मागे गेला. साधूने एक अग्नी लावली व त्यात लाकडे टाकत बसले तेव्हा शेठ म्हणाला महाराज तुमच्याकडे माझ्या समस्येचं समाधान नाही का? साधू म्हणाले तुझी समस्या या आगीसारखी आहे. तुझ्यात देखील क्रोध आणि लालसेची आग आहे तू ते सोडून प्रेमाचा मार्ग वापर समाधान नक्की मिळेल. त्याने क्रोध आणि लालच पण सोडलं मुलांशीच नाही तर सर्वांशी प्रेमाने वागू लागला आणि त्याला असलेला ताण कमी झाला. यातून इतकेच शिकायला मिळते कि क्रोध आणि लालच कधीच नाही येऊ दिला प्रेमाने राहिले तर सर्व काही ठीक होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *