साधू आणि नर्तकीची कथा : आपण जे काम करू त्यामागे आपली दृष्टी नेहमी चांगली असावी

एका गावामध्ये एक साधू निवास करत होते. रोज सायंकाळी ते झाडाखाली बसून गावातील लोकांना उपदेश देत असत. साधू मनुष्याने आनंदी जीवन कसे जगावे, चांगले कार्य कसे करावे असे अनेक उपदेश लोकांना देत असे. आजूबाजूच्या गावातील लोक देखील साधुंकडे उपदेश घ्यायला येत असे. साधूकडे खूप गर्दी होत असे मात्र एके दिवशी त्यांच्या गावात एक नर्तकी आली. नर्तकी देखील याच गावात राहायला लागली व रात्री नृत्य करू लागली. नृत्य करून पैसे कमावण्यासाठी ती नर्तकी या गावात आली होती.

गावात नर्तकी आल्याने तिचा नाच पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले व नर्तकीला देखील चांगले पैसे मिळू लागले. साधूकडे होणारी गर्दी कमी झाली आणि लोक नर्तकीकडे जाऊ लागले. एक दिवशी साधूने उपदेश घेण्यासाठी आलेल्या एका गावकऱ्याला विचारले पूर्वी येणारे सारे लोक का येत नाहीत. अगोदर उपदेश घेण्यासाठी गर्दी व्हायची आता मात्र काहीच लोक इथे येतात. त्यावर तो गावकरी म्हणाला गावात एक नर्तकी आली आहे आणि तिचा नाच पाहायला रोज रात्री लोक तिकडे जातात.एक वर्ष ओलांडलं आणि एके दिवशी त्या गावात जोराचं वादळ आलं या वादळामध्ये नर्तकी आणि साधू दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ते यमराजाच्या आज्ञेची वाट पाहत होते. साधूने चांगलं काम केलं असल्याने त्याला स्वर्ग मिळेल आणि नर्तकीने नाच करून पैसे कमावल्याने तिला नरक मिळेल असे साधूला वाटत होते. यमराजाने दूताला सांगितले कि नर्तकीला स्वर्गात न्या आणि साधूला नरकात. असे ऐकून साधू म्हणाला मी तर चांगले कार्य केले असून मला नरकात का पाठवता. यावर यम म्हणाले, तू जीवनात सर्वाना चांगले मार्ग दाखवले पण स्वतः ते अमलात आणले नाहीत तू निस्वार्थी मनाने लोकांना दिशा दाखवली नाहीस स्वार्थ तुझ्यामध्ये होता म्हणून तुला नरक मिळणार. नर्तकीने मनोभावे नृत्य करून निस्वार्थी पने नृत्य केले म्हणून तिला स्वर्ग. यावरून इतकाच बोध घ्यावा कि नेहमी चांगल्या मनाने काम केलं तर फळ नक्कीच चांगले मिळते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *