सुश्मिता सेन कडून प्रत्येक आईवडिलांनी शिकायला हवेत मुलांची काळजी घेण्याचे हे ६ गुण

१. लहान मुलांमध्ये प्रामाणिकपणा असतो ते नेहमी खरं बोलतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी खरं बोलावं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नेहमी खरी द्यावी नाहीतर त्यांची दिशाभूल होते. सुश्मिता च्या मुलीने रीना ने शाळेतून आल्यावर प्रश्न केला कि माझे वडील कोण आहेत त्यावेळी सुश्मिताने शिवलिंग दाखवले व म्हणाली कि हेच तुझे वडील आहेत. २. जीवनात शिस्त महत्वाची आहे मात्र त्यासोबत मस्ती देखील करायला हवी. मुलानी वाईट कृत्य केल्यावर त्यांना ओरडणे गरजेचे आहे मात्र त्यांना नेहमी ओरडत न राहता त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे मस्ती करणे देखील गरजेचे आहे. सुश्मिता आपल्या मुलांसोबत मैत्रिणीप्रमाणे राहते.

३. सुश्मिता म्हणते कि मुलांबाबतीत कधीच हरायचे नाही. मुलांना मोठे करण्यासाठी अनेक अडचणी येतात मात्र हताश न होता त्याचा सामना करणे गरजेचे आहे. अनेक अडचणी मुलांना मोठे करण्यासाठी येतात मग पैश्यांची अडचण असो, मुलांची तब्बेत खराब असो किंवा काहीही समस्या असो. ४. सुश्मिता चे म्हणणे आहे कि ज्ञान हे कोणतीही लढाई जिंकण्याचा सर्वात मोठं माध्यम आहे. यामुळे नेहमी मुलांना अभ्यासाकडे आणि सामान्य ज्ञानाकडे प्रोत्साहित करावे. मात्र मुलांनी परीक्षेत जास्त मार्क काढावे यासाठी त्यांनच्यावर दबाव टाकू नये. ५. अनेक आईवडील आपण स्वान पूर्ण न झाल्याने मुलांवर ते सोपवतात आणि तेच करायला सांगतात. असे न करता मुलांना स्वतःची निवड स्वतः करून द्यावी त्यामधील गन ओळखावे व त्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळवून द्यावा. मुलांना ज्या गोष्टीत करिअर करायचं आहे त्यासाठी आपण त्यांना सपोर्ट करावा. ६. काही जणांना आई नसते किंवा काहींना वडील नसतात पण घाबरून न जात किंवा अभाव न जाणवत स्वतः एकटेही तुम्ही मुलांना सांभाळू शकता. सुश्मिताने अनेकदा हे सिद्ध करून दाखवलं आहे कि, मुलांना एकटी आई देखील मोठं करू शकते. तिच्यानुसार मुलांना सांभाळून योग्य संस्कार देऊन मोठं करण अवघड असत पण असम्भव कधीच नसत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *