तीन साधूंची प्रेरणादायी कथा, एकदा वाचाच

एकदा एका गावातील घरासमोर तीन साधू येऊन उभे राहतात. घरामध्ये पती पत्नी राहत असतात. घराबाहेर तीन साधू उभे असलेले पाहून पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणते आपल्या घराबाहेर साधू आले आहेत तुम्ही पहा काय म्हणतात ते. त्यावर नवरा उत्तर देतो कि तूच बघ त्यांना काय हवं आहे. स्त्री त्या साधुंकडे जाऊन म्हणते कि तुम्हाला मी काय देऊ. त्यावर साधू म्हणतात आम्ही खूप दिवसांपासून भुकेले आहोत आम्हाला स्वादिष्ट पोटभर जेवण हवं आहे. स्त्री म्हणते घरात या मी तुम्हाला जेऊ घालते. त्यावर साधू म्हणतात कि तुझ्या पतीची परवानगी घे आणि मग आम्हाला सांग.

पत्नी नवऱ्याला सांगते कि साधून जेवण हवं आहे. पती साधूनां जेऊ घालण्याची परवानगी पत्नीला देतो. पत्नी साधुंकडे येऊन म्हणते माझ्या पतीने तुम्हाला जेवण द्यायची परवानगी दिली आहे तुम्ही आत या. साधू म्हणतात आम्हा तीन साधूंची नावे धन, सफलता आणि प्रेम आहे. आपमच्या तिघांपैकी एकजण तुमच्याकडे जेवण करू शकतो. तुम्ही जर धन नावाच्या साधूला जेऊ दिले तर तुम्हाला धन प्राप्ती होईल, प्रेम नावाच्या साधूला जेवण दिले तर तुमच्या घरात प्रेमाचा वास राहील, असेच सफलता चे देखील आहे. तुम्ही आपल्या पतीला विचारून ठरवा कि कोणाला जेवण द्यायचे आहे.पत्नी पुन्हा नवर्याकडे जाते आणि घडलेला प्रकार सांगते. पती म्हणतो आपण धन नावाच्या साधूला जेऊ घालू आपल्याकडे खूप धनाची प्राप्ती होईल. नवऱ्याचं हे ऐकून पत्नी म्हणते मला वाटत आपण सफलता ची निवड करावी पण पती धनावर ठाम असतो. ते ठरवतात कि आपण धन आणि सफलता दोघांना जेऊ घालू. पत्नी बाहेर जाते व म्हणते आम्ही धन आणि सफलता या दोघांना जेऊ घालू इच्छितो. स्त्रीच हे म्हणणं ऐकून तिघेही साधू निघू लागतात त्यावर स्त्री म्हणते काय झाले का चाललात. साधू म्हणतात आम्ही लालची, स्वार्थी लोकांकडे जेवण करत नाहीत तुम्ही धन व सफलता निवडलं त्याऐवजी तुम्ही प्रेम निवडलं असत तर आम्ही तीघेही तुमच्याकडे जेवलो असतो. कारण ज्या घरात प्रेमाचा वास असतो तेथे धन आणि सफलता येतेच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *