स्वबळावर आधीपेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

मित्रानो मागील पाच वर्ष्यानखाली म्हणजेच २०१४ साली निवडणूक झाली तेव्हा मोदीजींनी स्वबळावर २८२ जागांवर आपला झेंडा रोवला होता. यावेळी २०१९ मध्ये मोदीजींच्या भाजप पक्षाने त्यात वाढ करून २९९ जागांवर आघाडीवर आहे. यावरून लक्ष्यात येते कि आधीपेक्षा त्यांचं कार्यात वाढ झाली असून विरोधकांना हि मोठी चपराक आहे. मित्रपक्षासोबत म्हणजेच युतीसोबत पहिले असता २०१४ साली ३३६ जागांवर विजय भाजपने मिळवला होता व यावेळी २०१९ मध्ये ३४४ जागांवर आघाडीवर आहे. यावरून युतीने देखील पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळवल्यासारखे वाटते मात्र निकालाला थोडा अवधी शिल्लक आहे.

आघाडीवरूनच लक्ष्यात येते कि विजय हा नक्कीच झालेला आहे आणि पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळवून हा विजय होईल असं आघाडीवरून दिसून येत. मोदीजी विरोधात विरोधकांनी नोटबंदी, राफेल घोटाळा, जीएसटी अश्या अनेक प्रश्नांना पुढे करत मोदींना घेतल्याचं चित्र होत मात्र निकालानंतर विरोधकांचा हा डाव मोडीत काढला गेला असल्याचं चित्र समोर येत. २०१९ मध्ये देखील जनतेने मोदींना साथ दिली आहे व त्यांच्या नुसार विकासाला आणि योग्य नेत्याला मत दिल आहे. मोदींनी केलेला हवाई हल्ला यामुळे लाखो लोक मोदींकडे वाळल्यासारखे वाटते पण मात्र ज्याचं त्याच वेगळं मत असतं.स्वबळावर आधीपेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरले आहेत. ठिकठिकाणी गुलाल उधळून, पेढे वाटून, फटाके फोडून, मोदी मोदी च्या घोषणा देत उत्साह साजरा केला जात आहे. मोदींनी देशाला अजून पुढे न्यावं शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात व बेरोजगारीवर जास्त लक्ष केंद्रित करावं हीच एक आशा जनतेला आहे. निकालानंतर अनेक जोक्स देखील वायरल होत आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतच असतील. मोदीजींना भावी वाटचालीसाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *