NMJOKE

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून झाला अंदमानात दाखल. वाचा

मित्रानो मागच्या वर्ष्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची स्थिती अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागत आहे तर अनेकांनी जीव देखील पाण्यामुळे गमावला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता ऐकायला मिळत आहे. हवामानखात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून १८ १९ मे दरम्यान अंदमानात दाखल झाला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं, अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे.

यावर्षी मान्सून अंदमानात उशिरा दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून वर्तवण्यात आली होती. दुसरीकडे अंदमानमध्ये १८-१९ मे पर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. मी महिन्याच्या शेवटच्या पाच ते सात दिवसांमध्ये मान्सून अंदमानात दाखल होतो मात्र यावेळी जवळपास आठ दहा दिवसांआधीच मान्सून अंदमानात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसाठी आणि दुष्काळग्रस्त गावातील लोकांसाठी हि आनंदाची बातमी आहे.मान्सून दाखल लवकर झाला हि तर आनंदाची बातमी आहेच त्यासोबतच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. अल नीनो वादळाचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा मान्सून खूपच जास्त आनंदाचा आहे. जास्त पाऊस पडू शकतो व दुष्काळी भाग देखील पाणेरी होतील. शिवाय पाणी फाउंडेशन व सरकारी योजनांनी पाणी जीरपावे यासाठी केलेल्या छोट्या मोठ्या प्रकल्पांमुळे पाणी जीरपण्यास मदत होईल व पाणी मुरून ते उन्हाळ्यात सुद्धा वापरले जाईल ज्याने भयावह दुष्काळाची स्थिती उद्भवणार नाही. आता फक्त जास्त पाऊस पडण्याची वाट लोक पाहत आहेत.
Exit mobile version