NMJOKE

बाईकची बैलगाडीला धडक, युवकांसोबत बैलाचाही मृत्यू

मित्रानो आजच्या आधुनिक युगात गाड्यांची संख्या वाढली आहे. गाड्या वाढल्याने अपघातात वाढ होत आहे अश्यात रात्रीच्यावेळी लोक गाडीचा दिवा चालू करायला विसरतात अनेकांचे दिवे खराब झालेले असतात यामुळे पुढे काय असलेले दिसत नाही त्यामुळे अपघात होतो. अशीच एक घटना वर्धा येथे घडली आहे. या अपघातात तरुण आणि बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्यामुळे दुचाकीचा आणि बैलगाडीचा भीषण अपघात झाला आहे त्यामुळे तरुणाला रात्री गाडी चालवणं जीवावर बेतलं.

वर्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर खांबाडा शिवारात रात्रीच्या सुमारास वरोराकडे जात असलेल्या बैलगाडीला दुचाकीने जबर धडक दिली. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. बाईकस्वार गाडी वेगात चालवत होता रात्रीच्या अंधारात त्याला समोरचे दिसले नाही आणि जोरात बैलगाडीच्या बैलाला धडक दिली. यामध्ये एक बैल आणि दुचाकीस्वार अश्विन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशील कडू हा तरुण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. दोघेही वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मुरपाठ येथील राहणारे आहेत.रात्रीच्या वेळी दिवे नसताना गाडी चालवणे चुकीचे आहे. बैलगाडीने तर रात्रीच्या वेळी गाडी काढूच नये बैलगाडीला दिवे नसल्याने समोर कोणी असल्याचे दिसत नाही. गाडीच्या दिव्यांचा प्रकाश जास्त लांब नसल्याने आणि गाडी वेगात असल्याने अचानक समोर आलेली बिनदिव्याची अथवा बैलगाडी, घोडागाडी असेल तर ते दिसणार नाही आणि गाडी कंट्रोल करणे देखील अशक्य आहे त्यामुळे अपघात होऊ शकतो. या अपघातात मला वाटते कि बैलगाडीची चूक आहे ज्याने रात्रीच्या वेळी बैलगाडी रस्त्यावर चालवली.
Exit mobile version