aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

का सहा महिने बंद असत केदारनाथच मंदिर, पहा हैराण करून टाकणारे आणखीन रोच तथ्य

चारही धामांची यात्रेचं महत्वपूर्ण मंदिर केदारनाथ मानलं जात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे देखील एक आहे. भारतात हिंदू धर्माचे लोक राहतात व ते मोठ्या भक्ती भावाने देवाची पूजा करतात. हिंदू संस्कृती भारताला लाभल्याने भारताला प्राचीन इतिहास देखील प्राप्त झाला आहे. अजूनही भारतात हजारो वर्ष्या पूर्वीची मंदिरे पाहायला मिळतात. केदारनाथ चे मंदिर देखील त्यापैकीच एक असून या मंदिराला देखील रहस्य लाभले आहे. जगात जरी ७ अबे असले तरी अश्या कितीतरी रहस्यमयी घटना आहेत ज्यांचा उलगडा अजून झाला नाही.

केदारनाथ मंदिर हे ६ महिन्यांसाठीच भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते तर इतर सहा महिने हे मंदिर बंद असते. अशी मान्यता आहे कि या मंदिराचे दर्शन घेतल्यावर सर्व दुःख दूर होतात व मोक्षाची प्राप्ती होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील काही दिवसांपूर्वी येथे गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले. केदारनाथ मंदिरात भू शिवलिंगाची पूजा केली जाते आणि या शिवलींगाची उत्पत्ती आपोआप जमिनीतून झाली होती. या मंदिराचं निर्माण पांडवांनी केलं होत. बैलाच्या रूपात महादेवांनी पांडवांना दर्शन दिल.केदारनाथ चे हे मंदिर नेहमी बर्फाने झाकले गेलेले असते आणि येथील खराब मोसमामुळे या मंदिराचे कपाट सहा महिन्यासाठी बंद केले जातात. कपाट बंद करण्यापूर्वी पुजारी विग्रह आणि दंडी याना खाली घेऊन जातात. मंदिराच्या परिसराची स्वछता करून आतमध्ये एक दिवा लावला जातो व मंदिर बंद केले जाते. यात रहस्याची बाब म्हणजे हा दिवा सहा महिने जळत राहतो. हा छोटासा दिवा सहा महिने कसा जळत राहतो हे अजून माहित नाही मात्र जेव्हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हे मंदिर सहा महिन्यांनी उघडले जाते तेव्हा दिवा जळताना दिसतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *