बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे

बुलेट ट्रेन हा एक मोठ्या प्रकल्पामधून एक आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून आता नॅशनल हाय स्पीड काॅर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या कंपनीने बुलेट ट्रेन साठी भरती सुरू केली आहे. यामध्ये प्रथम बॅचच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. यात स्टेशन ऑपरेशन, ट्रेन ऑपरेशन, रोलिंग स्टाॅक, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड ट्रॅक अशा ऑपरेशन आणि मेन्टेनन्स पदासाठी एकूण १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे १३ जण मुंबई ते अहमदाबाद हाय स्पीडनं जाणाऱ्या ५०८ किमी लांब रस्त्यावरच्या या प्रोजेक्टचं काम पाहतील. यासाठी त्यांना जपानी भाषा अवगत असणे गरजेचे आहे.

ज्यांना जपानी भाषा येते तेच लोक येथे अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी जपानला पाठवलं जाणार आहे. तुम्हला याविषयी स्पष्ट माहिती हवी असेल तर नॅशनल हाय स्पीड काॅर्पोरेशन लिमिटेड यांचे संकेतस्थळावर म्हणजेच nhsrcl.in या वेबसाईटवर मिळेल. जपानमधून १३ लोक ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर ते इतर लोकांना प्रशिक्षण देणार आहेत. या आर्थिक वर्षात २६ चालकांना बुलेट ट्रेनचं ट्रेनिंग देणार असून पुढच्या वर्षात आणखी ३० कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आणखीन मोती भरती बुलेट ट्रेनमध्ये निघू शकते.भारतात बुलेट ट्रेन आल्यानंतर ती महाराष्ट्रात १५५.७६ किमी, गुजरातमध्ये ३८४.०४ किमी आणि दादर नागर हवेलीत ४.३ किमी अशी फिरेल. सुरुवातीला १० बुलेट ट्रेन बनवणार असल्याचे सांगितले आहे. बुलेट ट्रेन हि समुद्राच्या खालून प्रवास करणार आहे. हा एक मोठा प्रकल्प असल्याने भारताचे नाव खूप मोठे होईल आणि विकासासोबत दळण वाढेल, रोजगार वाढेल. आता आपण बुलेट ट्रेन ची मोठी भरती कधी निघते याची वाट पाहू शकतो व त्यांच्या संकेतस्थळावरून त्यांचे अपडेट्स पाहू शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *