सलमानने अजूनही जपून ठेवला आहे ऐश्वर्याचा हा फोटो, ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच केला शेअर

मित्रानो हम दिल दे चुके सनम हा अजय देवगण, सलमान खान आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. त्यावेळीच सलमान आणि ऐश्वर्या यांचं प्रेमप्रकरण जुळलं. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये होत होत्या मात्र ते जास्त वेळ एकत्र राहू शकले नाहीत व त्यांच ब्रेकअप झालं. १८ मे २०१९ रोजी संजय लीला भन्साळी यांचा “मालाल” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमाद्वारे जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी आणि संजय लीला भन्साळी यांची भाची शरमिन सेहगल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

चित्रपटात पदार्पण करत असल्याने सलमानने ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या वेळी १९९९ साली काढलेला एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून शरमिन सेहगलला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सलमानने दिल्या. सलमानने शेअर केलेल्या या फोटोत सलमान, संजय लीला भन्साळी आणि चिमुकली शरमिन आहे. हा फोटो ‘हम दिल दे चुके सनम’ च्या सेटवरच आहे जेव्हा शरमिन खूप लहान होती. फोटोंमध्ये तिघांचा चेहरा दिसत असला तरी सलमानच्या मागच्या बाजूला असणारी तरुणी ऐश्वर्या राय आहे.सिनेमाच्या टायटल सॉन्गच्या वेळी ऐश्वर्या राय ने हा ड्रेस घातला होता. सलमानने हा फोटो शेअर करत शरमिनला शुभेच्छा देताना सलमाननं लिहिलं, ‘या फोटोमधील गोंडस लहान मुलगी शरमिनला आता सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्याची वेळ झाली आहे. मलाल पासून सुरू होत असलेल्या तुझ्या या प्रवासत तुला खूप सारं यश आणि प्रेम मिळो.’ हा फोटो सलमानने क्रॉप करून टाकला असला तरी चाहत्यांच्या नजरेतून सलमान वाचू शकला नाही. अनेकांनी कमेंट्स करून त्या पोस्टला प्रतिसाद दिला व यावरून सलमान ऐश्वर्याला मिस करत असल्यासारखे देखील वाटते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *