प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि ….

मित्रानो प्रेमामध्ये लोक वेडे होतात त्यामुळे प्रेमभंगानंतर ते तिच्यासाठी अथवा त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र चारित्र्यावर संशय आल्याने किंवा आपापसातील वादामुळे देखील भयानक गोष्टी घडत असतात. अशीच एक भयानक घटना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत घडली आहे. आपण नवीन घर घेणार आहोत असं सांगून प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि तिच्या नाकावर चाकूने वार करून प्रेमिकेच नाक कापल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली आहे.

नवीन घर पेमीकेला दाखवण्याच्या बहाण्याने तो प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि तिच्या नाकावर चाकूने वार करून नाक कापले. नंतर स्वतः तिला रुग्णालयात नेऊन गाडीवरून पडली असल्याने तिच्या नाकाला लागल्याचे खोटे कारण डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीने प्रियकराच्या विरोधात कोतवाल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन वर्ष्यांपासून दोघे लिव्ह इन मध्ये एकत्र राहत आहेत. महिलेला दोन मुलं देखील आहेत.प्रियकराला महिलेच्या चारित्र्यावर संशय असल्याने तो सतत तिला मारहाण करत असल्याचे महिलेने सांगितले. २००९ पासून ते सोबत असल्याचे देखील महिलेने सांगितले. महिलेच्या चारित्र्याच्या संशयावरून युवकाने तिचं नाक कापल्याची माहिती देण्यात आली आहे. हि घटना भयानक असल्याने आपण देखील सतर्क राहणे गरजेचे आहे. जोडीदार निवडताना एकमेकांचा स्वभाव, सवयी जाणून घेणे आवश्यक आहे. दोघांची एकमेकांवर प्रेम असेल व एकमेकांना सांभाळून घेण्याची क्षमता असेल तरच आपला जोडीदार निवडावा असे आम्हाला वाटते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *