Home / बातम्या / चाऱ्याच्या अभावामुळे पशुधन धोक्यात, हे खाऊ घालून गायींना ….

चाऱ्याच्या अभावामुळे पशुधन धोक्यात, हे खाऊ घालून गायींना ….

महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध होत नाही. हंडाभर पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहे, त्यात उन्हाचा तडाखा. माणसांना पाणी नाही ते जनावरांना कुठून देणार असे अनेक प्रश आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नीळगव्हाण मध्ये असलेल्या गोशाळेत जवळपास १२०० गायी आहेत. पाऊस जेष्ठ न झाल्याने चाऱ्याची कमतरता येथे भासू लागली आहे. चार मिळत नसल्याने गायीची हाडे दिसू लागली आहेत.

गायींना चारा मिळावा यासाठी गोशाळा संचालकांनी तहसिलदारांना जानेवारी महिन्यातच अर्ज देवून चाऱ्याची मागणी केली होती. मात्र चार आला नाही यासाठी गायींना जिवंत ठेवण्यासाठी कलिंगड, टरबूज खायला दिले जात आहे. गायी जिवंत राहाव्या यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. चार नाही म्हणून पर्यायी कलिंगड, टरबूज त्यांना दिले जाते मात्र तरीदेखील त्यांची भूक भागात नसल्याने त्या कमकुवत झाल्या आहेत. याना वाचवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर चार पाण्याची व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशीच दुष्काळग्रस्थ अवस्था आहे. मागणी करून सुद्धा अजूनही या भागात एक ही चारा छावणी सुरु झाली नाही. त्यामुळे चारा-पाण्याविना पशुधन जगवावे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांना पडल्याचे मालेगाव येथील गोशाळा-गोरक्षक समितीचे सदस्य सुभाष मालू यांनी सांगितले आहे. मात्र आमच्याकडे चारा छावणीबाबत मागणी आलेली नाही असे मालेगावचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत म्हणाले. पुढे ते म्हणाले आम्ही गोशाळाना भेट दिली आहे, या भागात चारा छावण्या सुरु करणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

Check Also

आयसीसी चा मोठा निर्णय, नो बॉल मुले नाही होणार आता वाद

मित्रानो भारतातच नव्हे तर भारत बाहेर देखील क्रिकेट या खेळाचे लाखो चाहते आहेत. नुकतीच वर्ल्ड …

Leave a Reply

Your email address will not be published.