बीड जिल्ह्यात चौथा पाण्यामुळे बळी, महिलेच्या अंगावर….

पाऊस जास्त न झाल्याने दुष्काळ पडला आहे आणि पाण्याची खूपच कमतरता अनेक गावात दिसून येते. दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात पाण्यासाठी चौथा बळी गेला आहे. शनिवार दिनांक १८ मे २०१९ रोजी पत्नी मीनाक्षी घुगे आणि पती अनुरथ घुगे हे पाणी आण्यासाठी शेतातील बोअरकडे गेले होते. पाण्याने भरलेला ड्रम पत्नी मीनाक्षीने मागे पकडला होता व पती अनुरथ दुचाकी चालवत होता. पाणी भरून घरी परतत असताना दुचाकी घसरली व २८ वर्षीय महिला मीनाक्षी यांच्या अंगावर तो पाण्याने भरलेला ड्रम पडला व दोघेही जखमी झाले.

अनुरथ व मीनाक्षी याना लगेच जिल्हा रुग्णालयात नेले गेले. रुग्णालयात जात असतानाच २८ वर्षीय महिला मीनाक्षी घुगे यांचा मृत्यू झाला. पती अनुरथ खाजगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा रुग्णालय पोलीस चौकी मध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. पाण्यामुळे जीव गेल्याची हि बीडमधील चौथी घटना आहे. याआधी गेवराई तालुक्यामधील चकलांबा येथे एका वृद्ध महिलेचा आडातून पाणी काढताना आडात पढून मृत्यू झाला होता.चकलांबा घटनेपूर्वी वडवणी तालुक्यातील चिंचाळा या गावी बैलगाडीत पाण्याचा ड्रम दोन चिमुकल्या मुलांवर पडून दोघांचा मृत्यू झाला होता. तीन पाण्याचे बाली गेले असून हि चौथी घटना बीड मध्ये घडली आहे. बीड जिल्ह्यात पाण्याची कमतरता असून हंडाभर पाण्यासाठी लोक वणवण भटकत आहेत. पाणी आणायला जाताना देखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थोडा उशीर होईल मात्र जीव जाणार नाही याची दक्षता घ्या. सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना मदत मिळेल तेव्हा मिळेल पण स्वतः काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *