NMJOKE

२२ वर्ष्याच्या तरुण मुलीचं लग्न कसं करू, वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

बीड मध्ये असणाऱ्या वाघे बाभुळगाव येथे मारुती भोजने हे ६५ वर्षीय शेतकरी राहतात. मारुती भोजने याना पाच मुली आणि एक मुलगा. चार मुलींची लग्न लावून दिली मुलाला चांगले शिकवून मुंबई महानगरपालिकेत तो नोकरीला लागला. घरच सगळं चांगलं होईल या आशेने मुलगा नोकरीला लागल्यावर आनंदी झाले. पण यात्रेसाठी गावी आल्यानंतर घरी शेती जास्त झालं नाही, त्यात कर्जाचा डोंगर, २२ वर्षीय तरुण बहिणीचं लग्न या टेन्शनमुळे मारुती भोजने यांचा मुलगा अशोक भोजने याला अट्याक आला आणि हे जग सोडून निघून गेला.

घरातील एकुलता एक मुलगा आणि करता तरुण गेल्याने ६५ वर्षीय वडील मारुती भोजने याना देखील तणाव आहे. दुष्काळ असल्याने ४ एकर शेती असून २२ हजार रुपयांचा कापूस आणि १७ हजार रुपयांचं सोयाबीन झालं. ३९ हजार रुपयांमध्ये काय काय करणार याचा प्रश्न मारुती भोजने याना पडला आहे. मुलगा नेहमी म्हणायचं बहिणीचं लग्न चांगलं करायचं आपलं सगळं चांगलं होईल मात्र तो गावी आल्यावर असं घडलं आणि मारुती भोजने यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. मारुती भोजने यांची मुलगी २२ वर्ष्यांची झाली लग्नाला आली घरी पाहुणे तिला पाहायला यायचे मात्र पीक जास्त न झाल्याने लग्नासाठी पैसे नाहीत करता भाऊ जग सोडून गेला यामुळे ते पाहुणे परत पाठवले. मारुती भोजने यांच्या मुळीच नाव सुनीता आहे. मारुती भोजने यांची पत्नी देखील इतकं टेन्शन पाहून आजारी पडली. सरकारची मदत मिळेल या आशेने असे कित्तेक शेतकरी कुटुंब जगात आहे त्यांना सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र समजते दानशूर लोकांनी थोडीफार मदत केली तर त्यांचं थोडं ओझं कमी होईल.
Exit mobile version