NMJOKE

शेतकऱ्याच्या मुलीचं हे लग्न पाहून लोक झाले अवाक, पहा काय विशेष होते या लग्नात

मित्रानो उन्हाळ्याची सुट्टी आली कि लगीनसराई सुरु होते. मे महिन्यात मुलांना सुट्टी असल्याने अनेकजण लग्न हे उन्हाळासुट्टीतच ठेवतात. प्रत्येकाला वाटते कि आपल्या घरच लग्न वेगळ्या प्रकारे धूम धडाक्यात व्हावे. अनेक रॉयल लग्न तुम्ही पहिले असतील आज आम्ही तुम्हाला असच एक वेगळं आणि लक्ष्यात राहण्याजोगं लग्न झालेलं सांगणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात कोलोली गाव आहे इथे एक आगळावेगळा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नात चक्क वऱ्हाड बैलगाड्यांमध्ये बसून लग्नमंडपात पोहचलं.

मारुती श्रीपती जाधव यांची एकुलती एक मुलगी तृप्ती जाधव हीच लग्न कोलोली गावातीलच विजय पांडुरंग पाटील या मुलाशी ठरलं. गावातीलच मुलगा असल्याने आणि मुलगी एकुलती एक असल्याने लग्न लक्ष्यात राहण्याजोग व्हावं हि मुलीचे वडील मारुती श्रीपती जाधव यांची इच्छा होती. त्यामुळे ३५ च्या वर बैलगाड्या त्यांनी बुक केल्या व सजवायला देखील सांगितल्या. बैलांना बैलपोळा या सनादिवशीच पुजले सजवले जाते मात्र त्यांना या लग्नात देखील सजवले गेले. सजवलेल्या बैलगाड्या आणि गुलाबी फेटे घालून गाड्यांचे मालक देखील उत्साही होते.मुलीला घोड्यावर बसवून आणि वऱ्हाडी बैलगाडीत मोठ्या हौशीने लग्नमंडपात गेले. हा आगळावेगळा विवाहसोहळा पाहून सगळे खुश झाले आपली जुनी बैलगाड्यांची परंपरा यांनी जपली आणि थाटामाटात मुलीचे लग्न पार पाडले. लग्नात आलेले पाहुणे देखील हे सर्व पाहून अवाक झाले. मुलगी एकुलती एक असल्याने घरचे देखील या लग्नामुळे खूप खुश होते त्यांच्या नेहमी लक्ष्यात राहील असं हे मंगलकार्य घडलं आहे. पारंपरिक पद्धतीने वर्हाड नेऊन शेतकऱ्यांनी आपल्या मुलीचे लग्न केले व संस्कृती जोपासल्याचे दिसून येते.
Exit mobile version