पाकिस्तानचे नुकसान, कोट्यावधी रुपये बुडाले

भारत पाकिस्तान यामध्ये सुरुवातीपासूनच वैर आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अनेक संकटे येत असल्यासारखं वाटत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सगळे निर्णय परिणामकारक ठरत नसल्याचं दिसून येत आहे. आता देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानी रुपया घसरल्याने पाकिस्तानी शेअर बाजारात भुकंप आला आल्यासारखे दिसते. पाकिस्तान स्टाॅक एक्स्चेंजचा बेंचमार्क इंडेक्स KSE-१०० काही तासांमध्येच ८०० अंकांची घसरण होऊन खाली आला.

काही तासांमध्येच ८०० अंकांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे जवळपास एक हजार कोटी पाकिस्तानी रुपये काही तासांमध्येच बुडाले. शेअर बाजाराच्या या घसरणीच्या मागे आईएमएफ कडून मिळणाऱ्या पॅकेजसंबंधी चिंता वाढली आहे. पाकिस्तान हे कच्च तेल हे दुसऱ्या देशांकडून आयात करते त्यामुळे आता कच्च तेल आयात करण्यासाठी रुपया घसरल्याने जास्त किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल. यामुळे पाकिस्तानातील महागाई वाढेल. कच्चे तेलाचं नाही तर रोज लागणाऱ्या अनेक वस्तू पाकिस्तान परदेशातून आयात करत असल्याने त्या वस्तू आता आयात करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. याचाच पाकिस्तानच्या बाजारपेठेवर होईल व तेथील महागाई वाढेल. शेअर बाजारातल्या तज्ज्ञांच्या मतानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता आणि रुपयाची घसरण याचा परिणाम पाकिस्तानी शेअर बाजारावर दिसायला लागला आहे. पाकिस्तानी सरकारनं कडक पावलं उचलली नाहीत तर शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *