NMJOKE

‘जीपीएस’च्या मदतीने पत्नीने घेतला अपघात झालेल्या पतीच्या कार चा शोध

आजच्या आधुनिक युगात सर्व काही जलद व सोपे झाले आहे त्याचा फायदा देखील आहे आणि नुकसान देखील. आज आपण ‘जीपीएस’ या साधनांद्वारे पत्नीने आपल्या नवऱ्याला कसे शोधले आणि तेथे पोहचल्यावर काय झाले पाहू. सचिन काकोडकर यांचं वय ३७ वर्षे असून ते वाघबीळ मधील आकाशगंगा सोसायटीत राहत होते. सचिन काकोडकर यांची पत्नी श्वेता या त्यांच्या माहेरी ठाण्यातील लोकमान्यनगर येथे गेल्या होत्या. सचिन काकोडकर हे बुधवार दिनांक १५ मे २०१९ रोजी सकाळी कार मधून आपल्या पत्नीला घरी घेऊन जाणार होते. येऊर येथील काम आटपून सचिन पत्नीला घ्यायला जाणार होते.

निम्म्यारात्री २ वाजता सचिन आणि श्वेता यांचं फोनवर बोलणं झालं होत मात्र सकाळी ठरलेल्या वेळेत ते घरी पोहचले नाहीत म्हणून श्वेता यांनी त्यांना फोन केला पण त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. बराच वेळ फोन लागत नसल्याने श्वेता यांनी चिंतीत होऊन आपल्या मोबाईल मधील जीपीएस यंत्रणेद्वारे पतीच्या कारचे लोकेशन शोधून काढले. त्यांनी त्या लोकेशनवर धाव घेतली. ठाण्याजवळ असणाऱ्या घोडबंदर येथील मुल्लाबाग परिसरात मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ात कार उलटून पडली होती. टीएमटीचे काही कर्मचारी श्वेता याना तेथे भेटले त्यांनी श्वेता याना कार शोधण्यास मदत केली. खड्यात पडलेली कार पाहून पोलीस अग्निशमन दल याना बोलावले व कार बाहेर काढून सचिन काकोडकर याना बेथनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण ते वाचू शकले नाही व डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घरातील करता पुरुष गेल्याने शोक व्यक्त होत आहे. सचिन यांच्या कुटुंबात ४ वर्ष्याच्या मुलगा श्लोक पत्नी व सचिन यांचे आईवडील राहतात. पत्नीने शक्कल लढवल्याने त्यांची कार व मृतदेह लवकर सापडण्यास यश आले.
Exit mobile version