NMJOKE

आठ देशांपैकी भारत आणि पाकिस्तानचा आंबा उत्पन्नात कितवा नंबर लागतो, भारताचे उत्पन्न पाहून गर्व वाटेल

मित्रानो फळांचा राजा आंबा सर्वानाच आवडतो आणि हा सर्वांचा आवडता आंबा बाजारात विक्रीसाठी देखील कधीच आला आहे. आजची आपली हि पोस्ट आंब्याच्या उत्पनाबाबतच आहे. आज आपण आठ देशांची माहिती घेणार आहोत त्यामध्ये जे आंबा उत्पन्नात पुढे आहे. आठ देशांपैकी भारताचे आंबा उत्पन्न किती होते हे पाहून तुम्हाला देखील गर्व वाटेल. आठव्या नंबरवर इजिप्त नावाचा देश आहे. इजिप्त मध्ये वर्षाला १२.५ लाख टन आंब्याचं उत्पादन होतं. तर सातव्या क्रमांकावर आहे ब्राझील. ब्राझीलमध्ये दर वर्षी १४.५ लाख टन आंबे उत्पन्न होतात. ब्राझीलचे आंबे अमेरिका, युरोपमध्ये विकले जातात.

आंबा उत्पन्नात सहावा क्रमांक पाकिस्तानचा लागतो. पाकिस्तानमध्ये १५ लाख टन आंबा निर्मिती होते त्यामुळे आठ देशांपैकी पाकिस्तानचा सहावा क्रमांक येतो. पाकिस्तान नंतर सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया या देशाचे आंबा उत्पन्न २१ लाख टन असून इंडोनेशियाचा पाचवा क्रमांक लागतो. चौथ्या नंबरवर येतो तो मेक्सिको देश इंडोनेशियापेक्षा फक्त १ लाख टन जास्त उत्पन्न असणाऱ्या मेक्सिको देशात २२ लाख टन आंबा उत्पन्न होतो. जर वर्षी ३४ लाख टन आंबा उत्पन्न करणाऱ्या थायलंडचा आंबा उत्पन्नात तिसरा नंबर लागतो.चीन हे सर्वच क्षेत्रात पुढे आहे त्यांची निर्यात देखील खूप आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या चीन देशात आंबा उत्पन्न देखील कमी नाही कारण दुसरा क्रमांक आंबा उत्पन्नात चीन चा लागतो. चीनमध्ये दरवर्षी ४७ लाख टन आंबा उत्पन्न होतो. प्रथम क्रमांकावर आहे तो आपला भारत, वाचून थक्क झालात ना पण भारतात दर वर्षी १.८७ कोटी लाख टन इतका जास्त आंबा उत्पन्न होतो. त्यामुळे भारत जगात जवळ जवळ ४१ टक्के आंब्यांची निर्मिती करतो. भारताचा फळांचा राजा आंबा यामुळेच म्हटले जात असेल. ५२७६.१ कोटी टन आंबे भारत जवळपास ५० देशांमध्ये निर्यात करत असल्याने भारत प्रथम क्रमांकावर येतो.
Exit mobile version