NMJOKE

सेल्फी घेत असताना डॉक्टर महिलेचा मृत्यू, पहा नेमका कसा झाला मृत्यू

आजकाल सेल्फीमुळे अनेक अपघात आणि त्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना सतत पाहायला मिळतात. सेल्फीमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशीच एक घटना एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. डॉक्टर महिलेला सेल्फी घेणं जीवावर बेतलं आहे त्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. या डॉक्टर महिलेचा मृत्यू गोव्यात सेल्फी घेत असताना झाला आहे. मृत डॉक्टर महिला ही मुळची आंध्रप्रदेशची असल्याची माहिती मिळाली असून तिचे नाव रम्याकृष्णा सांगितले जात आहे.

मंगळवारी १५ मे २०१९ रोजी ती आपल्या मित्रांसोबत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती. समुद्रकिनाऱ्यावर रम्याकृष्णा या महिला डॉक्टर सेल्फी काढत होत्या त्यावेळी मागून मोठ्या वेगाने लाट आली आणि त्यात रम्याकृष्णा खोलवर समुद्रात गेल्या. रम्याकृष्णा याना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मुळची आंध्रप्रदेशची २५ वर्षीय डॉक्टर युतुकुरू राम्यकृष्णा २०१८ पासून गोव्यामध्ये राहत होत्या. राम्यकृष्णा याना वाचवण्यासाठी त्यांच्या मैत्रिणींनी पाण्यात उडी घेतली मात्र त्यांना राम्यकृष्णा याना वाचवता आले नाही.सेल्फी काढण्यासाठी त्या एका दगडावर चढल्या होत्या तेव्हा अचानक मागून लाट आली आणि तोल जाऊन त्या पडल्या. रम्याकृष्णा यांची मैत्रीण वाचली पण रम्याकृष्णा या खोल समुद्रात गेल्या. रम्याकृष्णा मृत्यूदेह स्थानिकांना मिळाला. गोवा पोलिसांना स्थानिकांनी मृतदेह दिल्यानंतर तो पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात दिला व त्यानंतर रम्याकृष्णा यांच्या आंध्रप्रदेश च्या घरी त्या मृतदेहास सुपूर्त करण्यात आले. हि घटना वाचून हेच लक्ष्यात येते कि नेहमी सतर्क राहून आपण काळजी घ्यायला हवी.
Exit mobile version