सध्याच्या आधुनिक युगात माणूस माणुसकी विसरला आहे. पैश्यासाठी, संपत्तीसाठी , हौशेसाठी काहीही कृत्य भान विसरून करत आहे. अनेक भयानक घटना ऐकायला किंवा पाहायला मिळतात. आज आम्ही अशीच एक भयानक घटना तुम्हाला सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही म्हणाल असं देखील क्रूर कोणी होऊ शकत. बिहारच्या अररियामध्ये एक भयानक घटना घडली आहे एका गर्भवती महिलेचा खून केला आहे इतकाच नाही तर तिच्या पोटात असणारे ८ महिन्याचे बाळ वाचू नये म्हणून महिलेच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गर्भवती महिलेला तिच्या ८ महिन्याच्या पोटातील बाळासोबत तिच्या तीन मुलांना देखील मारून टाकले. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले व त्यांनी दिलेल्या माहिती नुसार ३० वर्षीय तबस्मूम म्हणजेच गर्भवती आई आणि तिची तीन मुलं समीर वय ४ वर्षे, आलिया वय ६ वर्षे, शब्बीर वय ८ वर्षे चा होता यांची देखील हत्या करण्यात आली. महिलेचा पती आणि इतर काही लोकांध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद असल्याने त्यांनी तबस्मूम आणि मुलांची हत्या केली.
