या माणसाने जे गावासाठी केले ते पाहून गर्व वाटेल, एकदा वाचाच

आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारतभर इतके दयाळू आणि निस्वार्थी लोक आहेत जे नेहमी दुसऱ्याचं भलं करतात तेही स्वतःकडे काही न ठेवता. अशीच एक घटना सोलापुरातील एका गावात घडली आहे. पाऊस कमी पडल्याने पाण्याचा तुटवडा अनेक गावात जाणवत आहे त्यातून ज्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यात टाकले आहे त्यांना सरकारची मदत मिळेलच किंवा मिळाली असेलच. परंतु जे तालुके दुष्काळग्रस्त यादीत नाही आणि पाण्याचा तुटवडा आहे अश्या गावांचं काय होईल?

उत्तर सोलापूर तालुक्यामधील कोंडी हे जवळपास ३००० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात पाण्याचा तुटवडा तर आहेच उन्हाळ्यात गावाचे काय होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला अश्यातच त्या गावातील ४५ वर्षीय सीताराम पाटील यांनी स्वतःच्या आईचे दागिने विकून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. सीताराम हे आपल्या दोन एकर शेतीत फुलांची शेती करतात व फुलांचे हार करून विकतात तसेच गावोगावी जाऊन सिमकार्ड देखील विकतात. त्यामुळे गावाच्या दृष्टिकोनातून सीताराम हे कंजूस म्हणून ओळखले जायचे.उजनी धरणातून पाणी आणण्याची संकल्पना सीताराम यांनी मांडली होती. मात्र सर्वानी ते हसण्यावारी घेतले आणि त्यांना मदत मिळाली नाही. नंतर त्यांनी स्वतः जलवाहिनी टाकण्याचा निर्धार केला त्यामुळे त्यांच्यासोबत जयराम भोसले, जालिंदर भोसले, तुलसीदास भोसले आणि सदाशिव गायकवाड यांची साथ लाभली. गावातील जेष्ठ मंडळींनी त्यांना आर्थिक मदत केलं मात्र गावातील पुढार्यांनी त्यांना हिणवन सुरूच ठेवलं. तरीही पैसे कमी पडत असल्याने सीताराम यांनी आपली आई मंदोदरी यांच्या सोन्याच्या पाटल्या विकल्या व जलवाहिनीचे काम पूर्ण केलं. कालव्यापासून तलावाचे अंतर साडेचार हजार फूट असून त्यांनी चार इंच व्यास असणाऱ्या २ जलवाहिन्या त्यांनी टाकल्या यासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च आला. सीताराम यांच्या कार्यामुळे ३००० लोकांना तसेच ७०० जनावरांना प्यायला पाणी मिळाले. त्यांची हि गावासाठी आणि लोकांसाठी केलेली कामगिरी त्यांनाच कळेल ज्यांना पाण्यासाठी लांब लांब भटकावे लागते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *