Home / बातम्या / पुण्यातील मुलीने फोन दिल्याबद्दल थँक्स म्हटल्यावर त्याने जबरदस्ती तिला केले ….

पुण्यातील मुलीने फोन दिल्याबद्दल थँक्स म्हटल्यावर त्याने जबरदस्ती तिला केले ….

पुण्यात अनेक विचित्र घटना घडत असतात. पुणेरी पायांमुळे सर्वांचे मनोरंजन होत असतेच मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आल्याने पुण्यात नेमकं काय चाललंय हे कोणाला काळात नाही. रस्ता चुकल्यामुळे एका तरुणीने आपल्या मित्राला पत्ता विचारण्यासाठी रस्त्यावरील थांबलेल्या आरोपी राम दबोडिया (वय ४२ वर्षे) याकडे मित्राला फोन लावून पत्ता विचारण्यासाठी फोन मागितला. त्यावर आरोपी राम दबोडिया याने फोन दिला देखील नंतर मुलीने फोन परत करून थँक्स म्हणण्यासाठी हात पुढे केला.

मुलीने थँक्स म्हणण्यासाठीच हात पुढे केल्यावर आरोपी राम दबोडिया याने तिचा हात खेचून तिला जबरदस्ती मिठी मारली व त्या तरुणीच्या गालावर किस केले. यामुळे पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. लष्कर पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली आणि आरोपी राम दबोडिया यास २४ तासांच्या आत शोधून काढून तुरुंगात टाकले. या बातमीनंतर पुण्यात नेमकं काय चाललं आहे हे लोकांना समजत नाही यासाठी मुलींनी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.पुण्यात अनेक मुली रात्री १२ नंतरही फिरतात मात्र कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे वयक्तिक काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी बिअरबारचा पत्ता नीट न सांगितल्याने तीन तरुणांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती त्यात अल्पवयीन तरुण जखमी झाला होता ती बातमी ताजी असतानाच दिनांक १५ मी २०१९ ला मुलीसोबत जबरदस्ती करून तिचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. यावरून पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही पुण्यातच नाही तर जगभरात कुठेही कधीही काहीही होऊ शकते यामुळे मुलींनी सावध राहिलेले बरे.

Check Also

आयसीसी चा मोठा निर्णय, नो बॉल मुले नाही होणार आता वाद

मित्रानो भारतातच नव्हे तर भारत बाहेर देखील क्रिकेट या खेळाचे लाखो चाहते आहेत. नुकतीच वर्ल्ड …

Leave a Reply

Your email address will not be published.