या ५ अभिनेत्र्या वयाने नवर्यापेक्षा मोठ्या आहेत, तिसऱ्या जोडीमध्ये तर आहे १२ वर्ष्यांचे अंतर

मित्रानो २०१८ चा डिसेंबर महिना लग्नांनीच भरलेला होता. अनेक सितार्यांनी लग्न करून आपला संसार थाटायला सुरुवात केली. निक जोनास आणि प्रियांकाचे अजब लग्न तुम्ही पहिले. अजब यामुळे कारण प्रियांकाचे वय ३६ वर्षे आहे आणि तिचा नवरा म्हणजेच निक जोनास याचे वय २६ वर्षे म्हणजे १० वर्ष्याहून प्रियांका मोठी आहे म्हणून अजब. अशीच आणखीन काही लग्न बॉलिवूड मध्ये झाली आहेत ज्यामध्ये पत्नी मोठी आहे त्या जोड्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया.

ऐश्वर्या राय : बॉलीवुड ची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि पूर्व मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या राय ने २००७ साली महानायक अमिताभ बच्चन चा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. ऐश्वर्या राय आपला नवरा अभिषेक बच्चन पेक्षा २ वर्ष्याने मोठी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेख च्या लग्नाची खूप चर्चा झाली होती न्यूज चॅनेल वर संपूर्ण दिवस त्यांचीच बातमी झळकली होती. शिल्पा शेट्टी : बॉलीवुड ची सर्वात फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने २००९ साली बिजनेसमैन राज कुंद्रा सोबत लग्न केले. या दोघांमध्ये पाहायचे झाले तर शिल्पा शेट्टी राज कुंद्रापेक्षा जास्त मोठी नाही पण तीन महिन्याने मोठी आहे. शिल्पा शेट्टी च्या लग्नाची चर्चा देखील खूप गाजली होती.अमृता सिंह : बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान पत्नी बॉलीवुड अभिनेत्री अमृता सिंह सैफ अली खान पेक्षा वयाने १२ वर्षे मोठी होती. २००४ मध्ये सैफ ने अमृता सोबत १३ वर्षे संसार करून घटस्फोट घेतला. जेव्हा या दोघांचं लग्न झालं होत तेव्हा अमृता मोठी हिरोईन होती आणि त्यावेळी सैफ आपल्या सफल करिअरसाठी स्ट्रगल करत होता. सध्याची नवीन अभिनेत्री सारा अली खान हि सैफ च्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अमृताचीच मुलगी आहे. उर्मिला मातोंडकर : ९० च्या दशकातील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने २०१६ मोहसीन अख्तर सोबत लग्न केलं. मोहसीन अख्तर हे उर्मिला मातोंडकर पेक्षा १० वर्ष्याने लहान आहेत. उर्मिला मातोंडकर चे सध्याचे वय ४४ आहे तर मोहसीन अख्तर चे ३४ वय आहे. सोहा अली खान : सैफ अली खान ची बहीण सोहा अली खान ने कुणाल खेमू सोबत २०१५ मध्ये लग्न केलं होत. सैफ अली खान आणि कुणाल खेमू यांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम देखील केलं आहे. काही वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. सोहा अली खान कुणाल खेमू पेक्षा ५ वर्ष्याने मोठी आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *