पुरुषांची दाढी करणाऱ्या या दोन बहिणींनी तोडला सचिनचा रेकॉर्ड

आपल्या भारतात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते मात्र आता मुली देखील पुरुषांचं काम मोठ्या चलाकीने, हुशारीने आणि उत्तम पने करतात. पुरुषांची दाढी करायची म्हणजे किती कठीण काम मात्र हे काम देखील दोन बहिणी उत्तम निभावत आहेत. उत्तर प्रदेशात बनवणारी टोला इथे राहणारे ध्रुव नारायण याना दोन मुली आहे. २०१४ साली ध्रुव नारायण याना लकवा मारल्याने त्यांना काम करता येत नव्हते व त्यामुळे त्यांना घरचा खर्च आणि मुलींच्या शिक्षणाची चिंता सतावू लागली. तेव्हा दोन्ही मुलींनी घराची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि वडिलांचं सलून दोघी चालवू लागल्या.

२०१४ पासून म्हणजे जवळ जवळ ५ वर्ष्यांपासून या मुली वडिलांचे काम चोख निभावत आहे मात्र त्यांची चर्चा आता जास्त होत आहे. “जिलेट” या ब्लेड कंपनीने या मुलींची जाहिरात बनवली आणि त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांची प्रसिद्धी इतकी वाढली कि, स्वर भास्कर, राधिका आपटे, फरहान अखतर अश्या अनेक दिग्गजांनी तिचे गुणगान गेले. मात्र आपल्या मराठमोळ्या सचिनचा देखील या दोन मुलींनी रेकॉर्ड मोडला. ज्योती आणि नेहा या दोन बहिणीनि सचिनचा रेकॉर्ड कसा मोडला ते देखील आपण पाहूया.सचिन तेंडुलकर ने आजपर्यंत कोणाच्या हाताने दाढी करून घेतली नाही तो स्वतःची दाढी स्वतः करत असतो मात्र सचिनने सोशल मीडियावर फोटो शेअर केला तो या मुलींकडून दाढी करून घेतानाचा. सचिनने त्यावर लिहले कि, मी अजून कोणाकडून दाढी करून घेतली नाही मात्र पहिल्यांदा या मुलींकडून दाढी करून घेतली आणि माझा इतक्या वर्ष्यांचा रेकॉर्ड या मुलींनि मोडला. खरंच या दोन मुली खूप कौतुकास्पद आहेत आणि त्यांना असच यश मिळत राहो हीच त्यांना सदिच्छा. सचिनने देखील या दोन मुलींना भेटून देखील स्वतःच भाग्य समजलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *