NMJOKE

या बॉलिवूड अभिनेत्यांनी हिरो बनण्यासाठी सोडली सरकारी नोकरी

शिवाजी साटम : सोनी टीव्हीवर लागणारी आणि गाजलेली मालिका सी आय डी तर सर्वाना माहित असेलच. या मालिकेत ए सी पी प्रद्युमन यांचा असणारा डायलॉग “कुछ तो गडबड है” हा सर्वाना माहित आहे. ए सी पी प्रद्युमनची भूमिका चोख निभावणारे शिवाजी साटम हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये कॅशिअर ची नोकरी करत होते. सरकारी नोकरी असून त्यांना अभिनय आवडत असल्याने त्यांनी नोकरी सोडून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. शिवाजी साटम हे सध्या ६९ वर्ष्यांचे आहेत आणि ते मराठी आहेत. वास्तव, गुलाम ए मुस्तफा, सूर्यवंशाम अश्या अनेक मोठ्या चित्रपटात त्यांनी काम करून आपल्या अभिनयाने लोकांचे मनोरंजन केले.

अमरीश पुरी : अमरीश पुरी याना कोण ओळखत नाही आज ते या जगात नसले तरी त्यांचे चित्रपट अजूनही लोक आनंदाने पाहतात. उत्कृष्ट व्हिलन ची भूमिका साकारणारे अमरीश पुरी “भारतीय स्टेट इन्शोरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” मध्ये काम करत होते. त्यांनी नोकरी करत अभिनय केला सुरुवातीला त्यांची निवड झाली नाही मात्र नंतर ते अभिनयासोबत नोकरी देखील करत होते. अभिनय क्षेत्रात निपुण झाल्यानंतर अमरीश पुरी यांनी नोकरी सोडली व अभिनयात खूप नाव कमावले.रजनीकांत : महाराष्ट्रातील असले तरी स्वतःला अगोदर तामिळ चे म्हणणारे मराठी दिग्गज अभिनेता रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांचे चित्रपट अजूनही इतके हिट जातात कि लोक सुट्टी टाकून चित्रपट पाहायला जातात. ६८ वर्ष्यांचे रजनीकांत हे देखील सरकारी नोकरीत रुजू होते. ते एक बस कंडक्टर म्हणून नोकरीला होते. नशिबाने त्यांना अभिनेता बनवले व उंच शिखरावर नेऊन ठेवले आज ते म्हातारे झाले असले तरी देखील तितकेच प्रसिद्ध आणि आदरणीय आहेत जितके त्यांचे चित्रपट येण्याच्या काळात ते प्रसिद्ध होते.
Exit mobile version