या घटनेनंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे पक्के मित्र झाले

१९७३-७४ साली दादा कोंडकेंनी सोंगाड्या चित्रपटाची निर्मिती खूप कष्टाने केली होती मात्र त्यावेळी मराठी चित्रपटांवर देखील राज्य होते ते हिंदी भाषिकांचेच. असे असल्यामुळे मराठी चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा विरोध असे. सोंगाड्या हा दादांचा पहिलाच चित्रपट आणि पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपट प्रदर्शनाला अडचणी. दादांकडे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जास्त अनुभव नव्हता आणि पैसे देखील नव्हता. परिणामी कोहिनुर चित्रपट गृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला.

कोहिनुर चित्रपटगृहात “तीन देवीया” हा हिंदी चित्रपट त्यावेळी लागला होता. त्यावेळीच मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता म्हणून दादांनी थेट “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें” ची भेट घेतली. मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी थेटर मालक नकार देतो हि गोष्ट बाळासाहेबांना खटकली आणि त्यांनी आदेश दिला व दादांचा सोंगाड्या प्रदर्शित झाला. बाळासाहेबांच्या साथीने दादा पुढे गेले आणि तेव्हापासून शेवट्पर्यंत दादांनी मागे वळून कधीच पहिले नाही. दिवसेंदिवस दादांच्या यशाची पायरी चढतच राहिली आणि बाळासाहेबांशी मैत्री वाढतच राहिली.चित्रपटानंतर दादांवर मराठी रसिकांनी भरभरून प्रेम केले. बाळासाहेबांच्या मदतीमुळे सोंगाड्या कोहिनूरला झळकला आणि बाळासाहेब दादा यांचे नटे व मैत्री घट्ट झाली. हे नटे इतके घट्ट होते कि बाळासाहेब नाराज असले तर त्यांच्या खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे तो म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनी देखील दादांची मैत्री अखेरपर्यंत संभाळली. दादांच्या निधनानंतर देखिल बाळासाहेबांनी भाषणात शिवतीर्थावर दादांची आठवण काढली होती मैत्री कशी असावी याच एक उत्तम उदाहरण दादा आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री हे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *